Search
Close this search box.

Eknath Shinde and Sanjay Dina Patil: मुंबईतील ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात, एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पुन्हा उधाण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्याचे उपमुख्यमंत्री असूनही कायम कार्यकर्त्यांच्या गराड्यात असणाऱ्या आणि अडीनडीच्या प्रसंगी कायम कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाण्यात एकनाथ शिंदे यांचा हात कोणीही धरु शकत नाही, असे म्हटले जाते. एकनाथ शिंदे यांच्या याच वृत्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) केवळ स्वत:च्याच पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नव्हे तर दुसऱ्या पक्षातील नेत्यांनाही वेळेप्रसंगी मदत करतात किंवा त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांची विचारपूस करतात. हाच अनुभव ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील (MP Sanjay Dina Patil) यांना आला आहे. संजय दिना पाटील यांच्या पत्नी पल्लवी पाटील यांचा अलीकडेच अपघात झाला होता. त्यामुळे त्या सध्या रुग्णालयात आहेत. ही गोष्ट कळताच एकनाथ शिंदे हे मंगळवारी संजय दिना पाटील यांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात (Fortis Hospital) गेले होते. एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. (Maharashtra Politics)

एकनाथ शिंदे यांनी अनेकदा राजकीय संघर्ष विसरुन यापूर्वीसुद्धा अनेक विरोधकांच्या बाबतीत अशा पद्धतीच्या भेटी घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. संजय राऊत आजारी असताना शिंदे यांनी आमदार सुनील राऊत यांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. आता त्यांनी संजय दिना पाटील यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि एकनाथ शिंदेंचा स्वभाव पाहता एरवी या गोष्टीकडे सामान्यपणे पाहिले गेले असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंचे खासदार फुटीच्या उंबरट्यावर असल्याच्या बातम्या जोर धरत असताना एकनाथ शिंदे हे संजय दिना पाटलांच्या पत्नीची विचारपूस करण्यासाठी वेळ काढून रुग्णालयात गेल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची कुजबूज सुरु झाली आहे.

Eknath Shinde: मध्यरात्री ठाकरेंचे खासदार गुपचूप शिंदेंना भेटल्याची चर्चा

काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे काही खासदार कोणालाही सुगावा लागू न देता एकनाथ शिंदे यांना भेटल्याची चर्चा रंगली होती. या बातमीने मोठी खळबळ उडाली होती. एप्रिल महिन्यात ही गुप्त बैठक झाल्याची चर्चा होती. रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी अचानक त्यांचा ताफा सोडून वेगळ्या मार्गाने गेली. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाच्या खासदारांना भेटले. रात्री उशीरा सुरु झालेली ही बैठक पहाटेपर्यंत सुरु होती. ठाकरे गटाकडून या बैठकीला खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह दोन खासदार व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते, अशी चर्चा होती. मात्र, ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी हे वृत्त फेटाळून लावले होते.

admin
Author: admin

और पढ़ें