Search
Close this search box.

भाजपत प्रवेश केलेल्या चक्क राज्यसभा खासदाराची पोलिस आले, पळा पळा अशी झाली अवस्था! अजामीनपात्र गुन्ह्यात पोलिस घरातून उचलण्यासाठी येताच मागच्या दारानं धूम ठोकली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आप सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या पंजाबचे राज्यसभा खासदार संदीप पाठक यांच्या विरोधात पंजाबमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. ही प्रकरणे भ्रष्टाचार आणि शोषणाशी संबंधित आहेत. पोलीस सूत्रांनुसार, हा गुन्हा अजामीनपात्र कलमांखाली नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची बातमी बाहेर येण्यापूर्वीच संदीप पाठक मागच्या दाराने दिल्लीतील घरातून बाहेर पडून धुम ठोकली. दावा केला जात आहे की, संदीप ज्या गाडीतून बाहेर पडले ती गाडी राज्यसभा सदस्य अशोक मित्तल यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. या गाडीवर जालंधरचा नंबरही आहे.

पंजाब पोलीस दिल्लीतील घरी पोहोचले

पाठक यांना अटक करण्यासाठी पंजाब पोलीस त्यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले असून, त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते. तथापि, पंजाब पोलीस किंवा सरकारी प्रवक्त्याकडून कोणतीही तत्काळ प्रतिक्रिया आलेली नाही. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना संदीप पाठक म्हणाले, “माझ्या विरोधात कोणताही एफआयआर दाखल झाल्याची मला माहिती नाही.” दरम्यान, दिल्ली पोलिसांनी खासदार संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घराला बॅरिकेड्स लावले आहेत. पंजाब पोलिसांनी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास दिल्ली पोलिसांशी संघर्ष होऊ शकतो. संदीप पाठक यांच्या आधी, ‘आप’ सरकारने पक्ष सोडून गेलेले आणखी एक खासदार राजिंदर गुप्ता यांच्या ट्रायडेंट फॅक्टरीवर प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत छापा टाकला होता. डॉ. संदीप पाठक यांनी 25 एप्रिल रोजी राघव चड्ढा आणि अशोक मित्तल यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. ‘आप’ सरकारने राघव चड्ढा आणि हरभजन सिंग भज्जी यांची सुरक्षाही काढून घेतली आहे.

तीन खासदारांवर यापूर्वीच कारवाई केली

राघव चड्ढा यांची Z+ सुरक्षा काढून घेतली

राघव चड्ढा यांनी ‘आप’ सोडल्यानंतर पंजाब सरकारने त्यांची Z+ सुरक्षा काढून घेतली. चड्ढा यांना पंजाब पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात येत होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी चड्ढा यांना काही काळासाठी सुरक्षा पुरवली. आता त्यांना सीआरपीएफकडून सुरक्षा पुरवण्यात येत आहे.

हरभजनची सुरक्षा काढून घेतली

माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार असलेल्या हरभजन सिंगल पंजाब पोलिसांकडून Y-श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात येत होती. त्यांनी पक्ष सोडल्यानंतर आणि भाजप खासदारांच्या यादीत त्यांचे नाव आल्यानंतर, पंजाब पोलिसांनी त्यांची सुरक्षा काढून घेतली. तत्काळ, दिल्लीहून ७ सीआरपीएफ जवान त्याच्या घरी पोहोचले. हरभजनने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. कोणत्या आधारावर सुरक्षा काढून घेण्यात आली, याचे उत्तर न्यायालयाने केंद्र आणि पंजाब सरकारकडून मागितलं आहे.

राजिंदर गुप्ता यांच्या कारखान्यावर छापा

पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळाने (पीपीसीबी) बरनाला येथील धौला येथे असलेल्या, सुमारे 5,000 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या ट्रायडंट ग्रुपचे मालक राजिंदर गुप्ता यांच्या कारखान्यावर छापा टाकला. याविरोधात गुप्ता पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात गेले. त्यानंतर न्यायालयाने 4 मे पर्यंत गुप्ता यांच्यावरील कोणत्याही प्रकारच्या दंडात्मक कारवाईला स्थगिती दिली.

admin
Author: admin

और पढ़ें