Search
Close this search box.

मोठी बातमी! सुप्रिया सुळेंना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीचा फटका, गेल्या दोन तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 आज महाराष्ट्र दिनाची सुट्टी आणि लागून आलेल्या शनिवार – रविवारीची सुट्टी या लॉग विकेंडमुळे पुन्हा एकदा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर वाहतूक कोंडी पाहिला मिळत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामन्यांसोबत खासदार सुप्रिया सुळेंना बसला आहे. गेल्या 2 तास त्या वाहतूक कोंडीत अडकल्या आहेत. त्यांनी स्वत: सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबद्दल माहिती दिली. गेल्या दोन दिवसांपूर्वी मानखूर्दमधील मोठ्या वाहतूक कोंडीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकल्या होत्या. तब्बल पाच तास अभिनेत्री वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या.

झेंडावंदनासाठी पोहोचू शकल्या नाहीत म्हणून…

मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीमुळे महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे पक्ष कार्यालयातील झेंडावंदनाला सुप्रिया सुळे पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे पुणे पक्ष कार्यालयातील झेंडावंदन माजी खासदार वंदना चव्हाण यांना करावे लागले.

एकही गाडी जागची हलत नाहीये – सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी वाहतूक कोंडी अडकल्यानंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी घाटातील वाहतूक कोंडीबद्दल दाखवलं आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की, सकाळी 7 पासून ठाण्याहून निघालो असून पण गेल्या दोन तासांपासून घाटात वाहतूक कोंडीमध्ये अडकलोय. वाहतूक कोंडीत गाडी उभी असताना गेल्या दीड-दोन तासांपासून आसपासच्या गाड्यांमधील लोकांशीही चांगली मैत्री झाली. पुढे त्या म्हणाल्यात की, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक या वाहतूक कोडींमध्ये अडकल्या आहेत. लाँग वीकेंड, किंवा कार्यक्रम असतील. पण सगळेच इथे ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. घाटातून मी खाली पाहिलं तर तिथे एकही गाडी जागची हलत नाहीये. व्हिडीओ म्हणून छान दृश्य घाटातून दिसतंय. पण नागरिकांची मोठी गैरसोय इथे होत आहे, असं सुप्रिया सुळे यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

सकाळपासून पुणे आणि मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरही प्रचंड वाहतूक कोंडी पाहिली जातेय. सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुण्याहून सातारा, कराड, सांगली आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहिला मिळत आहे. खेड शिवापूर टोलनाक्यापासून ते नवीन कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याच पाहिला मिळालं.

admin
Author: admin

और पढ़ें