पेट्रोल-डिझेल आणि CNG चे दर रोजच्या जीवनात फार महत्त्वाचे असते. याचे दर वाढले की एक एक करून सगळ्याच गोष्टींचे दर वाढायला सुरुवात होते. सध्या जागतिक घडामोडींमुळे इंधनाच्या किमतींमध्ये मोठी हालचाल सुरू आहे. तणाव वाढल्याने कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली. याचा थेट परिणाम जागतिक बाजारावर आणि इंधन दरांवर होताना दिसतो. भारतामध्ये सध्या पुरवठा सुरळीत असला तरी कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतींचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवर होत आहे.
शेलने वाढवले दर
खासगी इंधन कंपनी शेल इंडियाने एप्रिलच्या सुरुवातीला दरवाढ केली होती. त्यानुसार पेट्रोलमध्ये सुमारे 7.4 रुपये प्रति लिटर आणि डिझेलमध्ये तब्बल 25 रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली. या वाढीनंतर काही पंपांवर पेट्रोलचा दर 119.85 रुपये प्रति लिटर तर डिझेल 123 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला आहे. प्रीमियम इंधनाचे दर याहूनही जास्त आहेत.
नायरा एनर्जीनेही वाढवले दर
याआधी नायरा एनर्जी नेही मार्च महिन्यात दरवाढ केली होती. पेट्रोलमध्ये 5 रुपये आणि डिझेलमध्ये 3 रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली होती. मध्यपूर्वेतील तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.
कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये चढ-उतार सुरू
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये चढ-उतार सुरू आहेत. युद्धापूर्वी प्रति बॅरल सुमारे 70 डॉलर असलेला दर संघर्षानंतर 100 डॉलरच्या पुढे गेला होता. आता मात्र काही प्रमाणात घसरण होऊन तो पुन्हा 100 डॉलरच्या खाली आला आहे. Iran कडून होर्मुझ सामुद्रधुनी मार्ग पुन्हा खुला करण्याचे संकेत मिळत असल्याने बाजारात काहीशी स्थिरता येण्याची शक्यता आहे.
आजचे देशातले पेट्रोल-डिझेलचे दर
- दिल्ली – पेट्रोल: 94.77 | डिझेल: 87.67
- मुंबई – पेट्रोल: 103.54 | डिझेल: 90.03
- कोलकाता – पेट्रोल: 105.45 | डिझेल: 92.02
- चेन्नई – पेट्रोल: 100.84 | डिझेल: 92.39
- अहमदाबाद – पेट्रोल: 94.49 | डिझेल: 90.16
- हैदराबाद – पेट्रोल: 107.46 | डिझेल: 95.70
- पटना – पेट्रोल: 105.71 | डिझेल: 91.49
- बेंगळुरू – पेट्रोल: 102.96 | डिझेल: 90.99
- लखनऊ – पेट्रोल: 95.34 | डिझेल: 88.50
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील CNG दर
- मुंबई – सुमारे ₹80.50 ते ₹82.00 प्रति किलो
- नवी मुंबई – सुमारे ₹81.00 प्रति किलो
- ठाणे – सुमारे ₹80.50 प्रति किलो
- पुणे – सुमारे ₹91.50 प्रति किलो
- नागपूर – सुमारे ₹88.90 प्रति किलो
- नाशिक – सुमारे ₹93.65 प्रति किलो
- औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) – सुमारे ₹95.50 प्रति किलो
- कोल्हापूर – सुमारे ₹96.95 प्रति किलो








