आयआरएस अधिकाऱ्याच्या 22 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आल्याने राजधानी हादरली आहे. दिल्लीमधील अमर कॉलनीत बुधवारी ही हत्या झाली आहे. हत्या करण्याआधी तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा संशय़ आहे. मोबाईल चार्जरने तरुणीची गळा दाबून तिला ठार करण्यात आलं. मृत तरुणी ही 1997 बॅचच्या IRS (कस्टम) अधिकाऱ्याची मुलगी असल्याचं समोर आलं आहे.

या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हत्येपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र याबाबत अंतिम निष्कर्ष पोस्टमार्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणात घरातील जुन्या नोकरावर पोलिसांचा संशय आहे. हा नोकर मूळचा राजस्थानचा असून काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. घटनेनंतर तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल होऊन पुरावे गोळा करत आहे. घरातील आणि आसपासच्या CCTV फुटेजची पोलिसांकडून तपासणी सुरु आहे. आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. कॉल डिटेल्स आणि इतर तांत्रिक पुरावेही तपासले जात आहेत. मृत तरुणीने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते आणि सध्या युपीएसी परीक्षेची तयारी करत होती. तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.