Search
Close this search box.

बारामतीत उमेदवार देणाऱ्या काँग्रेससमोर फडणवीसांचं आव्हान! सुनेत्रा पवारांना दिला शब्द, ‘शक्य ते सर्व…’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या बारामती पोटनिवडणुकीसाठी तयारी करत आहेत. अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली असून, पोटनिवडणूक होत आहे. सुनेत्रा पवारांकडून बिनविरोध निवडून येण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र काँग्रेसने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला आहे. यामुळे निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट आहे. दरम्यान भाजपाही निवडणुकीत सुनेत्रा पवारांना शक्य ती मदत करण्यास पुढाकार घेत आहे. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता त्यांनी सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांच्यासह सुनील तटकरे, पार्थ पवार, हसन मुश्रीफ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. तब्बल एक तास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. या भेटीत बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाली.  उद्या बारामती पोटनिवणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याच्या अनुषंगाने ही भेट झाली.

यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल असं आश्वासन दिलं आहे. “पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील. सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल,” असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना दिला आहे.

बारामतीच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये मतमतांतरे

काँग्रेसची उमेदवारी माघार न घेतल्यास प्रचारात न उतरण्याचा निर्णय काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. आज काँग्रेसचे काही नेते दिल्लीत हायकमांडशी संपर्क साधणार आहेत. बारामतीची उमेदवारी माग घेण्यावर काँग्रेस मधील एक गट अजूनही ठाम आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही काँग्रेसशी संपर्क सुरू असल्याची माहिती आहे.

admin
Author: admin

और पढ़ें