Search
Close this search box.

Crime News: मॅरेज हॉलवर छापा, 80 तरुण-तरुणी आक्षेपार्ह स्थितीत सापडले; 31 अल्पवयीन ताब्यात, कारवाईनं खळबळ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

एका मंगल कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी ८० तरुण-तरुणी आक्षेपार्ह स्थितीत पकडले गेले. पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. पोलिसांच्या छाप्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटना बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील दावथ पोलीस ठाण्यात घडली आहे.

मालियाबागमध्ये असलेल्या एका मंगल कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी ३९ महिला आणि ४१ पुरुषांना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. या सगळ्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. बिक्रमगंजचे एसडीएम प्रभात कुमार यांच्या तक्रारीनंतर दावथ पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सगळ्या आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई सुरु केली आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ८० जणांपैकी ३१ अल्पवयीन आहेत. पैकी १८ मुली आणि १३ मुलं आहेत. अल्पवयीन मुलींच्या प्रकरणात पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे. छापा टाकण्यात आला त्यावेळी १३ अल्पवयीन मुलं सज्ञान महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडली. या प्रकरणांमध्ये विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या तरुण-तरुणींपैकी बहुतांश ग्रामीण भागांमध्ये राहणारे आहेत. यातील अनेक जणी शाळा आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या आहेत.

अल्पवयीन तरुणींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं. त्यानंतर अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर त्यांना बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आलं. या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामागे एखादं रॅकेट आहे का, याचा शोध सुरु आहे.

दावथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मालियाबादमध्ये प्रकाश मॅरेज हॉल अँड हॉटेलमध्ये एसडीएमच्या नेतृत्त्वात छापा टाकण्यात आला. त्यावेळी तिथे ८० तरुण-तरुणी आक्षेपार्ह स्थितीत सापडले. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

या सगळ्या मागे एखादी संघटना किंवा नेटवर्क असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सगळ्या शक्यता गृहित धरुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पकडण्यात आलेल्या सगळ्या तरुणांना, महिलांना न्यायालयात हजर करण्यात आलं. आरोपींच्या विरोधात विविध कलमांच्या अंतर्हगत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें