Search
Close this search box.

227 किलोचा जिवंत बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ! भारतात एवढा मोठा बॉम्ब नेमका आला कुठून?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 इराण-अमेरिका आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे आता जगात तिसरं महायुद्ध घडतं की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. मात्र असं असतानाच दुसरीकडे झारखंडमध्ये दुसऱ्या महायुद्धातील जिवंत बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा बॉम्ब सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हा परिसर सील केला असून आता हा बॉम्ब हलवण्यासंदर्भात लष्कराची मदत घेतली जात असल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

नेमका कुठे सापडला हा बॉम्ब?

झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्हातील बहारागोरा पोलिस स्टेशन हद्दीत सुवर्णरेखा नदीच्या काठावर असलेल्या पानिपाडा-नागुडसाई भागात हा जिवंत बॉम्ब 20 तारखेला सापडल्याचं सांगितलं जात आहे.  नदीच्या काठावर वाळू उत्खनन करताना स्थानिक लोकांना जमिनीखाली एक भल्या मोठ्या आकाराची वस्तू वाळूत गाडलेली आढळून आली.

227 किलो वजनाचा बॉम्ब

हा बॉम्ब अंदाजे 227 किलो वजनाचा आहे. हा बॉम्ब अमेरिकी बनावटीचा असून त्यावर एएन-एम64 (500 एलबी जनरल पर्पज बॉम्ब) असं लिहिलेलं आहे. हा बॉम्ब जिवंत म्हणजेच सक्रीय आहे. म्हणजेच त्याचा अगदी कोणत्याही वेळी स्फोट होऊ शकतो. बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉडने या बॉम्बची चाचणी करुन तो जिवंत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हा बॉम्ब नेमका आला कुठून?

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात म्हणजेच साधारण 1940 च्या दशकात पूर्व भारतामध्ये खास करुन सध्याच्या बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये अमेरिका आणि ब्रिटीश लष्कराचे तळ होते. बर्मा म्हणजेच म्यानविरुद्ध जपानशी लढण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग होता. या मार्गावरुन अमेरिकी युद्ध विमानांतून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, बॉम्ब वाहून नेले जायचे. त्यावेळी काही बॉम्ब परिस्थितीनुसार ड्रॉप केले जायचे. तसेच काही अपघातानेही पडायचे. त्यावेळी हे बॉम्ब न फुटताही गाडले जायचे.

हा असाच बॉम्ब असल्याचा एक अंदाज आहे. त्यावेळी टाटा स्टीलसारख्या प्रकल्पांनाही लक्ष्य करण्याचे प्रयत्न झाल्याचा दावाही केला जातो. त्यामुळे त्या प्रकल्पाशी याचा काही संबंध असेल अशीही चर्चा असली तरी त्याला काही ठोस पुरावे नाहीत.

भारतीय लष्कराची घेतली मदत

झारखंड पोलिसांनी इंडियन आर्मीच्या बॉम्ब डिस्पोजल युनिटकडून मदत मागवून हा बॉम्ब सुरक्षित स्थळी हलवला आहे. हे बॉम्ब 80 वर्षांनंतरही सक्रीय आहेत. या बॉम्बमध्ये वापरली जाणारी टीएनटीसारखी स्फोटकं दिर्घकाळ जैसे थे स्थितीमध्ये राहू शकतात. युरोपमध्ये आजही अनेक ठिकाणी असे दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब अगदी आजही सापडतात. हे बॉम्ब नियंत्रित स्फोटाच्या माध्यमातून किंवा डिफ्यूज करुन निष्क्रिय केले जातात.

admin
Author: admin

और पढ़ें