Search
Close this search box.

Ashok Kharat Case: मोठी बातमी : रुपाली चाकणकर पुरावे नष्ट करतील, 58 व्हिडीओ म्हणजे 58 महिलांवर अत्याचार, रुपाली पाटलांचे खळबळजनक आरोप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने बुधवारी पहाटे कारवाई करत अशोक खरात याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे. या पेन ड्राइव्हमध्ये तब्बल 58 व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर येत आहे. तर या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी अशोक खरात यांची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे  (Rupali Patil Thombare) यांनी या प्रकरणात खळबळजनक आरोप केलेत.

Rupali Patil Thombare on Rupali Chakankar: रुपाली चाकणकर पुरावे नष्ट करतील

रूपाली ठोंबरे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, हा विषय कोणत्या पक्षाचा, जातीचा नाही तर हा विषय महिलांचा आहे.  1 वर्षापूर्वी या प्रकरणाची वाचा फोडली होती. ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली निलेश चाकणकर आहेत. त्यामुळे पोलिस कारवाई करत नव्हते का? 58 व्हिडिओ आहेत. म्हणजे 58 महिलांवर अत्याचार झाला आहे का?  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पदापदावरून पायउतार झाले पाहिजे. त्याशिवाय या प्रकरणाचा तपास पूर्ण होणार नाही.  चाकणकर मॅडम त्या पदावर राहिल्या तर पुरावा नष्ट करणार, असा आरोप त्यांनी केलाय.

Rupali Patil Thombare on Rupali Chakankar: …तर संपूर्ण राज्यभर आंदोलन करणार

रूपाली ठोंबरे पाटील पुढे म्हणाल्या की, सर्व ट्रस्टवर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. जर रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिला नाही तर संपूर्ण राज्यभर आंदोलन करणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या कानावर हा विषय टाकणार आहे. संविधानिक पदावर असल्यामुळे, तपास योग्य होणार नाही, त्यांनी रुपाली चाकणकर यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, असे देखील त्यांनी म्हटले.

Ashok Kharat Nashik Crime News: नेमकं प्रकरण काय? 

दरम्यान, अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाणे येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून, त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. बुधवार, 18 मार्च रोजी पहाटे सुमारे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक खरात याला ताब्यात घेतले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला असून, गेल्या काही वर्षांत ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून त्याने नाव कमावले होते.

admin
Author: admin

और पढ़ें