Search
Close this search box.

मुंबई, ठाण्यात गुढीपाडवा शोभा यात्रेला दिमाखात सुरुवात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अकोला शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरातून या महारॅलीला सुरुवात करण्यात आली. पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या वातावरणात रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले. अखेरीस बिर्ला राम मंदिरात या रॅलीचा समारोप करण्यात आला.या महारॅलीत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारोच्या संख्येने अकोलेकर सहभागी झाले होते. शहरातील अनेक ठिकाणी नागरिकांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करत पुष्पवृष्टी केली. विशेष म्हणजे ‘संस्कृती संवर्धन समिती’कडून गेल्या १९ वर्षांपासून गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी अशा प्रकारच्या महारॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.अकोल्यात नववर्षाच्या स्वागताचा हा उत्साहपूर्ण सोहळा यंदाही मोठ्या जल्लोषात पार पडला.

कल्याणच्या ऐतिहासिक नगरीमध्ये गेल्या 27 वर्षापासून गुढीपाडवा निमित्त शोभायात्रा निघत असते आज देखील कल्याण सांस्कृतिक मंच आणि जैन समाज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पुढाकाराने यावर्षी कल्याणमध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे या मिरवणुकीत सर्व जाती धर्माचे नागरिक सकाळपासूनच मिरवणूक मध्ये सहभागी झालेले आहेत मराठ मोळा हा नवीन वर्षाचा सण आहे या मिरवणूक मध्ये मराठी तरुणांनी आणि देखील डोक्यावरती भगवे फेटे घालून परिधान केले महिला बाईक वर फेटे बांधून गुडी घेऊन मिरवणुकीत सहभाग त्याचप्रमाणे जैन समाजाचे महिला, गुजराती समाजाची महिला,साउथ इंडियन वाद्या,नारीशक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मावळ्यां सोबत अशी घोड्यावरती स्वार होऊन भव्य अशी मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे यावर्षी कल्याण ती 27 व्या गुढीपाडव्याची मिरवणूक आहे रस्त्यावादी रांगोळ्या त्याचप्रमाणे चौका चौकामध्ये मिरवणुकीचा स्वागत केला जात आहे.

मालेगावात मराठी नववर्षाचा उत्साह शिगेला पोहोचला असून गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिलांची भव्य बाईक रॅली निघाली आहे. नऊवारी साडी आणि भगवे फेटे घालून महिलांचा अनोखा अंदाज पाहायला मिळत असून शहरातून काढलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी शंखनाद करत पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

admin
Author: admin

और पढ़ें