Search
Close this search box.

इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमेरिकेनं इराणविरुद्ध आजवरच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची धमकी देताच इराणने सुद्धा आपला निकराचा प्रतिकार सुरुच ठेवला आहे. इराणने अमेरिकेच्या दोस्त राष्ट्रांना होरपळून काढण्याची मालिका कायम ठेवताना आज (7 मार्च)दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर (runway) एका ड्रोनने धडक दिली. हा ड्रोन इराणची राजधानी ‘तेहरान’ येथून डागण्यात आल्याचा संशय आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, विमानतळावर एक मोठा स्फोट ऐकू आला आणि त्यानंतर हवेत धुराचे मोठे लोट पसरले. सोशल मीडियावरही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. गेल्या आठवड्यातही इराणने आखाती देशांवर केलेल्या हल्ल्यात दुबई विमानतळाच्या एका टर्मिनलचे नुकसान झाले होते आणि 4 कर्मचारी जखमी झाले होते.

एमिरेट्सची उड्डाणे रद्द (Emirates)

विमानतळावरील कामकाज तात्पुरते ठप्प: प्रवासी, विमानतळ कर्मचारी आणि एअरलाईन क्रू यांच्या सुरक्षेचा विचार करून, दुबई सरकारने विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली. या घटनेनंतर ‘एमिरेट्स’ने दुबईला येणारी आणि जाणारी सर्व उड्डाणे पुढील सूचनेपर्यंत रद्द केली आहेत. ज्या प्रवाशांचे बुकिंग 28 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान होते, त्यांना तिकीट रद्द करण्याचा (refund) किंवा तारखा बदलण्याचा पर्याय देण्यात आला आहे. ‘फ्लाईट रडार’च्या माहितीनुसार इतर विमानांना 60 ते 90 मिनिटांचा विलंब होत आहे.

अंशतः कामकाज सुरू आणि प्रवाशांना सूचना

नंतर दुबईच्या मुख्य विमानतळावरून (DXB) आणि अल मक्तूम विमानतळावरून (DWC) काही उड्डाणे अंशतः सुरू करण्यात आली. मात्र, जोपर्यंत एअरलाईन्सकडून प्रवासाची पुष्टी मिळत नाही, तोपर्यंत प्रवाशांनी विमानतळावर येऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें