Search
Close this search box.

भारतीय हवाई दलाचं Su-30MKI लढाऊ विमान कोसळलं; दोन पायलट ठार, महाराष्ट्रातील पायलटचा समावेश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भारतीय हवाई दलाचं बेपत्ता झालेलं सुखोई लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचं समोर आलं आहे. आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात काल रात्री सुखोई Su-30 MKI लढाऊ विमान कोसळून ही दुर्घटना घडली आहे. प्रशिक्षण मोहिमेवर असलेले Su-30MKI जोरहाटपासून सुमारे 60 किमी अंतरावर असलेल्या आसाममधील कार्बी आंगलोंग परिसरात कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. फ्लाईट लेफ्टनंद पूर्वेश दुरूगकर आणि स्क्वॉड्रन लीडर अनुज अशी त्यांची नावं आहेत.

भारतीय हवाई दलाने एक्सवर पोस्ट शेअऱ करत सांगितलं आहे की, “आयएएफचे सर्व कर्मचारी मनापासून शोक व्यक्त करत आहेत आणि या दुःखाच्या वेळी शोकग्रस्त कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत,”  SU-30 MKI प्रशिक्षण मोहिमेवर होते आणि जोरहाट एअरबेसवरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच बेपत्ता झाले होते. उड्डाण केल्यानंतर 60 किमी अंतरावर ते दुर्घटनाग्रस्त झालं.

भारतीय हवाई दलाने या घटनेबद्दल काय सांगितलं होतं?

भारतीय हवाई दलाने एक्सवर बेपत्ता सुखोई 30 बद्दल माहिती दिली होती.”भारतीय हवाई दलाचे एक Su-30 MKI विमान बेपत्ता झाल्याची माहिती आहे. विमानाने आसामच्या जोरहाट येथून उड्डाण केले आणि संध्याकाळी 7.42 वाजता शेवटचा संपर्क साधण्यात आला. अधिक माहिती गोळा केली जात आहे. शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे,” असं त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे.

राफेलनंतर सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान

राफेलनंतर Su-30MKI भारतीय हवाई दलाचं सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान आहे. हवाई संरक्षण, खोलवर हल्ला आणि समुद्री कारवायांमध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सध्या, भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या ताफ्यात फक्त सुखोई-30MKI आहे.

हायटेक बनवण्याची योजना

सुखोई-30 MKI ला ‘सुपर सुखोई’ (Super-30) प्रोग्राम अंतर्गत आधुनिक बनवण्याची तयारी केली जात आहे. 2040 पर्यंत त्यांना पूर्ण सक्षम करण्यासाठी याची गरज आहे. 63 हजार कोटींच्या या प्रोजेक्टमध्ये, 84 विमाने स्वदेशी AESA रडार, नवीन एव्हियोनिक्स, आधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्ध सूट आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी (ब्रह्मोस सारख्या) सुसज्ज असतील, ज्यामुळे त्यांचे आयुष्य 25 ते 30 वर्षांनी वाढेल, असं सांगण्यात येत आहे.

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात Su-30 कधी सामील झाले?

2002 मध्ये सुखोई Su-30MKI लढाऊ विमाने भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आली. 1996 मध्ये भारताने रशियासोबत Su-30 साठी करार केला. Su-30s ची पहिली तुकडी 1997 मध्ये भारतात डिलिव्हर करण्यात आली. अद्ययावत Su-30MKIs 2002 मध्ये भारतीय हवाई दलात सामील झाली. ही लढाऊ विमानं सुखोई आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे संयुक्तपणे तयार केली जातात. संयुक्त निर्मितीमधील पहिले Su-30 नोव्हेंबर 2004 मध्ये हवाई दलात सामील झाले. सध्या, Su-30MKI भारतीय हवाई दलाचा कणा आहे, ज्यांची संख्या 200  हून अधिक आहे.

admin
Author: admin

और पढ़ें