Search
Close this search box.

Bhigwan kidnapping case : अहिल्यानगर- पुणे- सासवड आणि बारामती व्हाया महाबळेश्वर…; अपहरणानंतर ‘ती’ प्रियकरासोबत कुठं-कुठं गेली?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भिगवण अपहरण प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजलेली असताना आता याच प्रकरणात काही नवे खुलासे होत आहेत. मंगळवारी चार वाजताच्या सुमारास सुमारास या मुलीचा अपहरण झालं त्यावेळी मुलीची आई आणि भाऊ यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकण्यात आली असं तक्रारीत म्हटलं होतं. मात्र वैद्यकीय अहवालत मिरचीची पूड टाकली नसल्याची माहिती समोर आली आहे. (Bhigwan kidnapping case)

इतकंच नव्हे, तर ज्या ठिकाणावरून मुलीचा अपहरण झालं त्या ठिकाणी मिरचीची पूड पडल्याचा पाहायला मिळालं. अपहरण केलं गेलं म्हणून सांगितलं  खरं. मात्र याच मुलीने तिच्या भावाच्या मोबाईलवरून तिच्या प्रियकराला फोन करून या संदर्भात कल्पना दिली होती की आपण कुठे आहोत ज्यानंतर कथित अपहरणानंतर ती फरार झाली. प्राथमिक माहितीनुसार फरार झालेली मुलगी आणि मुलगा हे घटनास्थळावरून अहिल्यानगर, अहिल्यानगरवरून पुणे, पुण्यावरून सासवड आणि सासवडकरून महाबळेश्वरला गेले. ज्यानंतर गुरुवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ते बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले.

तरुणीनं सांगितलं वास्तव… 

दरम्यान, मुलीने यापूर्वीच व्हिडिओद्वारे दावा केला होता मी आपण स्वेच्छेनं निघून आलो आहोत. मात्र तरीही ही बाब तिच्या घरच्यांनी नाकारली होती. इतकंच नव्हे तर या प्रकरणात मोर्चेही काढण्यात आले. गरम्यान बारामती शहर पोलीस ठाण्यात ही मुलगी तिच्या प्रियकरासोबत हजर झाली आणि पुढील माहिती समोर आली. सकाळी तिच्या प्रियकराला पोलीस खासगी गाडीतून घेऊन गेले मात्र त्यांना कुठे नेण्यात आलं ही बाब समोर आलेली नाही.

सदर प्रकरणात पोलीस याबाबत कमालीची गुप्तता पाळत असून, बारामती शहर पोलीस  ठाण्याच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त  लावण्यात आला आहे. मुलगी बारामती शहर पोलीस ठाण्यात असल्याचा सांगितलं जातंय, तर ते भिगवण पोलीस ठाण्यात असल्याची ही माहिती मिळत आहे. यासंदर्भात  विचारणा करण्यासाठी पोलिसांना संपर्क साधला असला तूर्तास पोलीस अधिकारी फोन उचलत नाहीत अशीच माहिती आहे.

admin
Author: admin

और पढ़ें