Search
Close this search box.

भीषण! अक्कलकोट, पंढरपूरच्या देवदर्शहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; चौघांचा मृत्यू, 9 जखमी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रस्ते अपघातांची वाढती संख्या सध्या प्रशासनापुढं अनेक आव्हानं उभी करून जात असून, यामध्ये आता आणखी एका भीषण अपघाताची भर पडली आहे. पंढरपूर मंगळवेढा मार्गावर शरदनगर नजीक क्रुझर आणि ट्रकचा बसचा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. श्री विठ्ठलाचे दर्शन करून जाताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली.

भाविक श्रद्धेने आणि भक्तिभावाने गाणगापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर या देवस्थानांच्या दर्शनासाठी आले होते. रविवारी अक्कलकोट- गाणगापूर इथं दर्शन आटोपल्यानंतर सोमवारी सकाळी अक्कलकोट येथून त्यानी क्रूझरने पंढरपूर गाठले. विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर त्यांचा अतिशय समाधानाने परतीचा प्रवास सुरू असतानाच नियतीने काळाचा घाला घातला.
पंढरपूर मधून मंगळवेढ्याच्या दिशेने निघालेल्या क्रुझर चालकाचा शरद नगर जवळ गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा भीषण अपघात घडल्याचे समजते. गवताने भरलेल्या ट्रॉलीला ट्रक ओव्हरटेक करत असतानाच क्रुझर चालकाचा ताबा सुटल्यामुळे दोन वाहनांची धडक झाली यामध्ये चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला ओढावला.

देवदर्शनासाठी गेलेले भाविक कुठले निवासी?

प्राथमिक पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील भाविक श्रद्धेने आणि भक्तिभावाने गाणगापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर या देवस्थानांच्या दर्शनासाठी आले होते. रविवारी अक्कलकोट, गाणगापूरच्या देवस्थळांचे दर्शन आटोपल्यानंतर सोमवारी रात्री पंढरपूर मधील दर्शन करून परतीचा प्रवास सुरू असतानाच नियतीने काळाचा घाला घातला. अतिशय भीषण स्वरुपातील या अपघातात तीन महिलांसह एका मुलाचा मृत्यू झाला तर, 9 वारकरी (भाविक) जखमी झाल्याचं वृत्त आहे.

अपघातांचं सत्र काही थांबेना…

नुकताच संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातील कोटमगाव या ठिकाणी येवल्याच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरचे चाक निखळून गेल्यानंतर कंटेनर अनियंत्रित झाला सदरचा कंटेनर हा डिव्हायडर ला जाऊन धडकल्याने भीषण अपघात झाला. अपघातात मात्र कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र कंटेनरचे मोठे नुकसान झाले. तर तिथं नवी मुंबईतील पाम बीच मार्गावरही 26 जानेवारीला एक अपघात झाला. वोक्सवॅगन गाडीच्या या भीषण अपघाताचं कारण भरधाव वेगानं वाहन चालवणे असल्याचे सांगण्यात येते. वेगावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात 1 तरुण गंभीर तर 4 जण किरकोळ जखमी झाले. ज्यानंतर जखमींना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले.

admin
Author: admin

और पढ़ें