Search
Close this search box.

KDMC मधील बेपत्ता नगरसवेकाचे पोस्टर लावणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ; बेपत्ता नगरसवेकाचे प्रकरण धक्कादायक वळणावर!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नगरसेवक मधुर मात्रे बेपत्ता प्रकरण तापल आहे. नगरसवेक बेपत्ता असल्याचे पोस्टर लावल्याने वाद निर्माण निर्माण झाला. पोस्टर लावणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात मधुर मात्रे यांच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानंतर हा विषय अधिकच गंभीर बनला आहे. बेपत्ता नगरसेवक मधुर मात्रे यांचे वडील उमेश मात्रे आणि पोलिसांच्या दबावामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कल्याण पूर्वेत ठाकरे गटाचे बेपत्ता नगरसेवक मधुर मात्रे आणि कीर्ती ढोणे यांच्या विरोधात ठाकरे गटांनी कोळसाळी परिसरात पोस्टर लावले होते. या पोस्टर वरती आमचे बेपत्ता नगरसेवक दिसल्यास शाखेत संपर्क साधा असा मजकूर देखील दिला होता. मात्र, हे पोस्टर लावण्याच्या प्रकरणात ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख रमेश टिके यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कारण पोस्टर लावल्यानंतर बेपत्ता नगरसेवक मधुर मात्रे यांचे वडील उमेश म्हात्रे यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात बदनामी केल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या या पोस्टल लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस ठकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार फोन करत असून पोलिसांनी काल दबाव टाकल्यामुळेच टिके यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या प्रकरणात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील, युवा अध्यक्ष नीरज कुमार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी संबंधित नगरसेवक मधुर मात्रे यांचे वडील उमेश म्हात्रे आणि प्रशासनाविरोधात 302 कलमान्वये हत्या गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

हरवलेले नगरसेवक शोधण्याच्या चांगल्या हेतूनेच पोस्टर लावले होते, असा दावा ठाकरे गटाने केला असून, राजकीय दबावाखाली खोटी बदनामीची तक्रार दाखल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पोलिसांच्या सततच्या दबावामुळे रमेश टिके मानसिक तणावात होते आणि याच तणावातून त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाने तीव्र निषेध नोंदवला आहे. वेळ आली तर शहर बंद व उग्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

कल्याण कोळशेवाडी बेपत्ता नगरसेवक प्रकरणी पोलिसांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.  ACP कल्याणी घेटे यांची माहिती कल्याण कोळशेवाडी बेपत्ता नगरसेवक प्रकरणात सुरू असलेल्या आरोप–प्रत्यारोपांवर आता पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कल्याणच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणी घेटे यांनी या संपूर्ण प्रकरणातील तक्रारी आणि सुरू असलेल्या चौकशीबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

कल्याण कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी, उमेश बळीराम म्हात्रे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा देवदर्शनासाठी बाहेर गेलेला असून तो त्यांच्या संपर्कात आहे. मात्र काही जणांनी त्याला बेपत्ता असल्याचे पोस्टर लावून बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे या तक्रारीवरून काल ठाकरे गटाचे पदाधिकारी नीरज दुबे आणि अन्य दोन जणांविरोधात अदखलपात्र तक्रार नोंदवण्यात आली असून त्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे.आज याच प्रकरणात ठाकरे गटाकडून उमेश म्हात्रे यांच्या तक्रारीविरोधात चौकशी करण्याचा अर्ज पोलिसांकडे सादर करण्यात आला आहे. त्या अर्जानुसार स्वतंत्र चौकशीदेखील सुरू असल्याची माहिती ACP कल्याणी घेटे यांनी दिली. दरम्यान, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली नसून, सध्या फक्त नीरज दुबे यांच्या अर्जासंदर्भातील चौकशीच सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें