Search
Close this search box.

Stock Market : भारतीय भांडवली बाजार गडगडला; डॉलरच्या तुलनेत रुपया 30 पैशांनी खाली; गुंतवणूकदारांमध्ये चिंता, नेमकं कारण काय?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती (India Pakistan War) दिवसेंदिवस अधिक चिघळत असून दोन्ही देश जवळजवळ युद्धाच्या उंबरठयावर पोहचलले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य तणावाचे थेट परिणाम भारतीय भांडवली बाजारावर  (Indian Capital Market)  होत असल्याचे समोर आले आहे. बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स 450 अंकांनी घसरला असल्याची माहिती समोर आली आहे. तर निफ्टी 145 अंकांनी खाली आला आहे. परिणामी  युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांकडून सावध पवित्रा घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपया देखील गडगडला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 30 पैशांनी खाली आला असून रुपया 85.88  प्रति डॉलर झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय भांडवली बाजार गडगडला, मुख्य कारण काय?

1. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यामुळे बाजारात अनिश्चितता वाढली आहे आणि गुंतवणूकदारांनी जोखीम टाळण्यासाठी शेअर्स विकले आहेत.
2. अलिकडच्या काळात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात भांडवल काढून घेतले आहे.
3. अमेरिका आणि युरोपीय बाजारपेठांमधील घसरण आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेचा भारतीय बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे.
4. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाला आहे, ज्यामुळे आयात महाग झाली आहे आणि महागाईची भीती निर्माण झाली आहे.
5. अलिकडच्या काळात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

गुरुवारी 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान

गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 5 लाख कोटी रुपयांचे मोठे नुकसान सहन करावे लागले. दुसऱ्या सत्रात जोरदार विक्रीमुळे बीएसई (BSE) बेंचमार्क सेन्सेक्स 411.97 अंकांनी म्हणजेच 0.51 टक्क्यांनी घसरून 80,334.81 वर पोहोचला आहे. व्यापक बाजारात, बीएसई मिडकॅप निर्देशांक 1.90 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक 1.05 टक्क्यांनी घसरला. या घसरणीमुळे, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 5, 00, 037.74 कोटी रुपयांनी घसरून 4,18,50,596.04 कोटी रुपये (4.93 ट्रिलियन डॉलर्स) झाले. बीएसई (BSE) वर एकूण 2,548 कंपन्यांचे शेअर्स तोट्यासह बंद झाले, तर 1,349 कंपन्यांचे शेअर्स वाढले आणि 135  कंपन्यांचे शेअर्स अपरिवर्तित राहिले.

admin
Author: admin

और पढ़ें