Search
Close this search box.

Mumbai Crime : पायधुनीतील ‘त्या’ कुटुंबातील मृतांच्या शरीरात पेनकिलरसदृश घटक?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईतील पायधूनी परिसरातून काही नुकतीच एक हादरवणारी बातमी समोर आली, जिथं बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू ओढावला. अतिशय संशयास्पदरित्या झालेल्या या मृत्यूप्रकरणी आता आणखी एक माहिती समोर आली असून, मृतांच्या शरीरात पेनकिलरसदृश घटक आढळला, असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदनादरम्यान हा घटक आढळला असला तरीही जेजे रुग्णालय प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. ज्यामुळं फॉरेन्सिक अहवालानंतर मृत्यूचं कारण समजणार आहे.

मृत्यू विषबाधेनं की…? 

पायधुनीत एका कुटुंबातील चौघांचा विषबाधेनं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मृतांच्या शरीरात पेनकिलरसदृश घटक आढळल्याचं म्हटलं जात आहे. मात्र जेजे रुग्णालय प्रशासनाकडून त्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. फॉरेन्सिक अहवालानंतरच चौघांच्या मृत्यूचं कारण समोर येणार आहे.

दरम्यान, या प्रकरणात खरंच कलिंगडाचा काही संबंध होता का, याचाच उलगडा कधी होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कलिंगड, दालचिनी पावडरसारखा पदार्थ मिसळलेलं पाणी, पुलाव-बिर्याणी, कच्चा तांदूळ, मसाले आणि अर्धवट खाल्लेल्या खजुरांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, त्याच्या निरीक्षण अहवालातून कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दक्षिण मुंबईमधील पायधुनीत विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या मुली आयशा आणि झैनब अशी मृतांची नावं. या चारही जणांनी त्यांच्या नातेवाईकांसोबत रात्री बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर मध्यरात्री कलिंगड खाल्लं. मात्र सकाळी या चारही जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

कलिंगडाची विक्रीच होईना… 

पायधुनीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा कलिंगडातील  विषबाधेमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर उन्हाळ्यातील अनेकांच्या आवडीचं फळ असलेल्या कलिंगडाबद्दल वेगाने अफवा पसरू लागल्या आहेत. या अफवांमुळे  वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगडाची विक्री निम्म्यावर आली आणि दरही गडगडले आहेत. पश्चिम आशियातील युद्धामुळे कलिंगडाची आखाती देशांकडे होणारी निर्यात बंद झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर माल स्थानिक बाजारात येत आहे. एपीएमसी फळ बाजारात सध्या दररोज सुमारे 4 ते 5 हजार क्विटल कलिंगडाची आवक होते. मात्र त्यापैकी दररोज केवळ 70-80 टक्के मालाचीच उचल होत असल्याने उर्वरित माल साठून राहत आहे. वाढलेली आवक आणि घटलेली मागणी यामुळे बाजारातील समतोल बिघडला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें