Search
Close this search box.

Nagpur Ratnagiri National Highway : नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम शेतकऱ्यांनी कोल्हापुरात बंद पाडले; ठेकेदारासह अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी धरले धारेवर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर जिल्ह्यातून जात असलेल्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून कडाडून विरोध होत असतानाच आता दुसऱ्या बाजूने सुरू असलेल्या नागपूर रत्नागिरी महामार्गाला सुद्धा शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शिये, भुयेवाडी, भुये या परिसरातील शेतकऱ्यांनी आज पाणंद रस्ता बंद झाल्याने आक्रमक भूमिका घेतली. या महामार्गाची पूर्णपणे नव्याने निर्मित होत असल्याने अनेक ठिकाणी पर्यायी रस्ता नसल्याने शेतकरी आक्रमक झाले.

आम्हाला किंमत आहे की नाही?
यावेळी शेतकऱ्यांनी काम घेतलेल्या ठेकेदारासह अधिकाऱ्यांना सुद्धा धारेवर धरले. यावेळी शेतकऱ्यांनी प्रेशर आणत असल्याचा आरोप करत आम्हाला किंमत आहे की नाही? अशी विचारणा अधिकाऱ्यांकडे केली. अधिकाऱ्यांकडून मोबदल्याचा मुद्दा उपस्थित होताच आम्ही मेल्यावर मोबदला द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अधिकारी व ठेकेदारांनी तुम्हाला सोयीस्कर असेल त्या पद्धतीने काम करून देतो, असे सांगण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या खालून ओव्ह साईज पाईप टाकावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. त्या ओव्हर साईज पाईपमधून शेतकऱ्यांच्या पीव्हीसी पाईप शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी नेता येतील, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. तुम्ही काम नीट करा, आम्ही तुमची अडवणूक करण्यासाठी कशाला येऊ? असेही शेतकऱ्यांनी यावेळी सांगण्याचा प्रयत्न केला.

शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा
दरम्यान, पुन्हा एकदा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग विरोधात वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात तापण्यास सुरुवात झाली आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावे बंद ठेवून सहकुटुंब 18 जूनला दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांची जमीन शक्तीपीठासाठी जाणार आहे. मात्र अल्प प्रमाणात नुकसान भरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा विरोध आहे.

28 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी करत बारा जिल्ह्यातील गोवा ते नागपूर या शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन संपादन करत असल्याचे जाहीर केले. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यांमध्ये आंदोलने सुरू आहेत. यासाठी सर्वपक्षीयांची मोट बांधून पुढील दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात शहाजी कॉलेजमध्य बैठक झाली होती. या बैठकीस आमदार सतेज पाटील , भारत पाटणकर , कॅाम्रेड गिरीश फोंडे यांचेसह जिल्ह्यातील शेतकरी व पदाधिकारी ऊपस्थित होते.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.