Search
Close this search box.

Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील मोठा गट काँगेसमध्ये जाण्याच्या तयारीत; लोकसभा निकालापूर्वीच बड्या नेत्याने बाॅम्ब टाकला!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा थेट लोकसभा निवडणुकीत रंगली असतानाच आता अजित पवार गटाने मोठा दावा केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील मोठा गट काँगेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. तटकरे यांनी पत्रकारांच्या अनौपचारिक चर्चेत हा मोठा दावा केल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. तटकरे यांनी पक्षांतर्गत नाराजीतून पक्षाला राम राम ठोकण्याच्या तयारीत आमदार असल्याचा दावा केला आहे.

अनौपचारिक चर्चेत बोलताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून आमदारांकडून सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही भेट कोणत्याही क्षणी होऊ शकते, असेही बोलले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे.

त्यामुळे सुनील तटकरे यांच्या या दाव्यानंतर राजकीय चर्चा रंगली आहे. यामध्ये काही महत्त्वाचे पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये सोनिया दुहान, धीरज शर्मा आदी नाराजांचा गट सोनिया गांधींसोबत जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. मात्र, नेमके कोण आमदार जाणार हे तटकरे यांनी सांगितलं नाही. अंतर्गत नाराजीने पाच ते सहा आमदार दिल्लीमध्ये सातत्याने जातात, असेही त्यांनी म्हटले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें