खेल

CSK vs SRH: हैदराबादमध्ये सनरायझर्सच ‘किंग्ज’, SRH कडून चेन्नईचा 6 विकेट्सने पराभव

आयपीएल 2024 मध्ये आज अठरावा सामना खेळवला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर चेन्नई विरूद्ध हैदराबाद यांच्यात सामना रंगला. या सामन्यात हैदराबादने चेन्नईचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. यंदाच्या या सिझनमधील हैदराबादचा हा दुसरा विजय आहे. तर चेन्नईला दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. हैदराबादकडून एडन मारक्रमने अर्धशतक ठोकलं आहे.

अभिषेक शर्माची उत्तम फलंदाजी
चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या ओपनर्सने चांगली फलंदाजी केली. 46 धावांवर हैदराबादला पहिला धक्का बसला. दीपक चहरने अभिषेक शर्माला बाद केले. अभिषेकने 12 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 37 धावांची तुफान खेळी केली. यावेळी ट्रेविस हेड 24 बॉल्समध्ये तीन फोर आणि एका सिक्सच्या मदतीने 31 रन्स करून बाद झाला. याशिवाय मारक्रमने अर्धशतक झळकावत मोलाचं योगदान दिलं.

चेन्नईकडून 166 रस्नचं आव्हान
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सीएसकेला फलंदाजी दिली. शिवम दुबेच्या 30 बॉल्समध्ये 45 रन्स आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या 23 नाबाद 31 रन्सच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादसमोर 166 रन्सचं लक्ष्य ठेवले. हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 165 रन्स केले.

शिवम आणि रहाणेने डाव सांभाळला
चेन्नईच्या टीमला पहिल्यांदा विकेट्सच्या रूपाने मोठे धक्के बसले. यानंतर युवा फलंदाज शिवम दुबे आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने डाव सावरला. रचिन रवींद्र आणि कर्णधार रुतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर शिवमने डाव सावरत रहाणेसोबत 60 रन्सची पार्टनरशिप केली. मात्र यानंतर डॅरिल मिचेल आणि धोनीला मोठी खेळी साकारता आली नाही.

Related Articles

Back to top button