Search
Close this search box.

Mumbai Rain : मायानगरीत पावसाचा धुमाकूळ, तीन दिवसात सहा जणांचा मृत्यू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मान्सूनच्या आगमनानंतर मुंबईसह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पण या पावसामुळे मायानगरी मुंबईमध्ये तीन दिवसांत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गोवंडी, विले पार्ले आणि विद्याविहारमध्ये सहा जणांचं निधन झालेय. तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, अनेक सखल भागात पाणी साचले होते, वाहतूक कोंडीही झाली होती. विद्याविहार आणि विले पार्ले येथे इमारतीचा भाग कोसळल्यामुळे दुर्घटना घडली होती. तर गोवंडीमध्ये मॅनहॉलमध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी उतरलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

विद्याविहारमध्ये दोन जणांचा मृत्यू –

मुंबईच्या विद्याविहार येथील 40 वर्ष जुन्या दुमजली इमारतीचा भाग कोसळला होता. रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली होती. ढिगाऱ्याखाली दोन जण अडकले होते. 20 तासानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अलका पालांडे आणि नरेश पालांडे अशी मृतांची नावे आहेत. तीन जणांना वाचवण्यात एनडीआरएफला यश आले.

विले पार्ल्यात इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू, 3 जखमी

विले पार्ले परिसरातही रविवार इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. रविवारी अडीच वाजता एका इमारतीचा भाग कोसळला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय. तर तीन जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी कूपर रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. 65 वर्षीय प्रिशिला मिसाईटा आणि 70 वर्षीय रोबी मिसाईटा या दोघांचा मृत्यू झालाय.

शनिवारी पावसामुळे दोन जणांचा मृत्यू –

पहिल्याच पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले होते. गोवंडीमध्येही पहिल्याच पावसात पाणीच पाणी झाले होते. तुंबलेले पाणी काढण्यासाठी मॅनहोलमध्ये (manhole) सफाई करण्यास उतरलेल्या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.सुधीर महेंद्र दास आणि रामकृष्ण निरंजन दास असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई –

मुंबईमध्ये शनिवारपासून ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. अनेक भागात पावसामुळे पाणी साचले आहे. पावसामुळे इमारतीचा भाग खचल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील पहिल्याच पावसात या दुर्घटनेमुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबई, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर वाढणार

मुंबईसह राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे. पुढील 48 तासांत मुंबई, ठाणे मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. मुंबई आणि मध्य महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात पुढील 48 तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. चक्रीवादळामुळे दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.