Search
Close this search box.

FAKE VACCINATION – मुंबईतलं बोगस लसीकरण, मुख्य आरोपीला पोलिसांनी केली अटक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईतल्या बोगस लसीकरणातील मुख्य आरोपी मनीष त्रिपाठी याला पोलिसांनी अटक केली आहे. मनिष त्रिपाठी आज कांदिवली पोलिसांसमोर शरण आला. त्याआधी त्याने दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. मनीषवर अनेक गंभीर आरोप असून मनिषनेच बनावट लस पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तसंच लसीकरणादरम्यान डाटा नोंद करण्यासाठी पासवर्ड चोरी करण्यासाठी मनीषकडूनच सांगण्यात आलं होतं.

शहरात विविध ठिकाणी बोगस लसीकरण शिबिर आयोजित करून फसवणूक करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. या प्रकरणी मुंबईच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये 5 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर या प्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून एसआयटी सुद्धा नेमण्यात आली आहे. या टोळीने कांदिवली, बोरिवली, वर्सोवा, खार अशा पश्चिम उपनगरांतील वेगवेगळ्या ठिकाणी ही बनावट लसीकरणाची खाजगी शिबिरं घेतली होती.

बोगस लसीकरणाप्रकरणी 10 जणांना अटक
मुंबईत सुमारे 2 हजार लोकांना बोगस लसी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी एकूण 10 जणांना अटक करण्यात आलीय. अटक आरोपींमध्ये शिवम हॉस्पिटलचे डॉक्टर शिवराज पटारिया आणि निता पटारिया यांचाही समावेश आहे. आरोपींकडून सुमारे 12 लाख रुपये जप्त करण्यात आलेत. धक्कादायक म्हणजे लसीऐवजी या भामट्यांनी चक्क सलाईनचं पाणी दिल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढं आलीय.

बोगस लसीकरणाचं पहिलं प्रकरण
कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज हाऊसिंग सोसायटीत सर्वात आधी बोगस लसीकरण घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर बोरिवलीच्या आदित्य कॉलेज आणि शिंपोली परिसरातील मानसी शेअर्स अॅण्ड स्टॉक अॅडव्हर्टायझर्स कंपनीनं आयोजित केलेल्या शिबिरात बोगस लसी देण्यात आल्या. वर्सोवा आणि खारमध्ये टिप्स कंपनीत, तर मालाडमध्ये बँक ऑफ बडोदामध्ये कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना बोगस लसी दिल्या. परळमध्ये पोद्दार एज्युकेशन सेंटरनं आयोजित केलेल्या शिबिरातही बोगस लसी दिल्याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.