Search
Close this search box.

Gokul Election: कोर्टाने गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; महायुतीला दणका, निवडणूक आयोगालाही निर्देश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू झालेला कायदेशीर पेचप्रसंग अखेर संपला आहे. कोल्हापूर सर्किट बेंचने आज (2 नोव्हेंबर) निवडणूक निर्णय अधिकारी आणि महायुतीला दणका देताना 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने सात दिवसांची नोटीस देत निवडणूक घ्यावी, असे निर्देश सुद्धा सर्किट बेंचकडून देण्यात आले. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाला होता, तो आता संपल्यात जमा आहे. गोकुळच्या सभेसाठी नियमावलीनुसार सभेची 14 संचालकांची गणपूर्ती आवश्यक आहे. ही संख्या पूर्ण न झाल्याने बोलावण्यात आलेली पहिली बैठक तहकूब करण्यात आली होती. यानंतर समविचारी आघाडीने समांतर सभा घेत शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवडणूक कली होती.

महायुतीकडून मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली

गोकुळची निवडणूक 18 ऑक्टोबर रोजी झाल्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी निकाल पार पडला होता. मात्र, निकालानंतर गोकुळच्या नियमावलीतील पोट नियमाचा दाखला देत महायुतीने अध्यक्ष निवडीच्या 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीला दांडी मारली होती. त्यामुळे अध्यक्ष निवड होऊ शकली नव्हती. महायुतीला 25 पैकी 12 जागा मिळाल्या आहेत, तर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला 13 जागा मिळाल्या आहेत. गोकुळच्या पोटनियमानुसार जर सलग तीन बैठकांना संचालक अनुपस्थित राहिल्यास, त्यांचं संचालक पद आपोआप रद्द होतं. दरम्यान, कोणत्याही स्थितीमध्ये सतेज पाटील यांच्या आघाडीला अध्यक्षपद मिळू नये, यासाठी महायुतीकडून मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली सुरू होत्या.

admin
Author: admin

और पढ़ें