ठाण्यातील शिवसेना पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्याकांडात मोठी बातमी समोर आली आहे. प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीने मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलगा राम पूर्णेकर यांनी मु्ख्यमंत्र्यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यानंतर शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकर कुटुंबांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी पूर्णेकर कुटुंबाने एकनाथ शिंदेंबद्दल नाराजी व्यक्त केली. हे पाहून प्रताप सरनाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन लावला आणि कुटुंबियांचं संवाद घडवून दिला. यावेळी राम पूर्णेकर यांनी मीनाक्षी शिंदेंवर कडक कारवाई करा, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली. तरदुसरीकडे प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीने मंत्री प्रताप सरनाईक यांना धक्कादायक माहिती दिली.
खुशबू पूर्णेकर हिने सरनाईकांसमोर दावा केला की, मला इन्स्टाग्रामवरून धमकीचा मेसेज आला आहे. ज्यात लिहिलंय होतं की, नेक्स्ट टार्गेट तू. त्यानंतर प्रताप सरनाईकांनी पूर्णेकर कुटुंबासोबत त्यांच्या घराबाहेर 24 तास सुरक्षा देण्याचे सूचना दिल्या आहेत.
प्रताप सरनाईक कुटुंबियांना काय म्हणाले?
प्रताप सरनाईक पूर्णेकर कुटुंबियांशी संवाद साधताना म्हणाले की, तुमच्या अन्याय होणार नाही. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचं प्रत्येकाला दुःख आहे. काही लोकांनी राजकारण केलं आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही संपर्कात आहोत. पण तेव्हा माहोल असा केला होत की आम्ही या गोष्टी टाळत होतो. रामसोबत परवा आणि आजही बोललो. आम्ही पूर्णपणे तुमच्याबरोबर आहोत. वैयक्तिक सगळे वकील उभे करतो, ज्यांनी इथे येऊन राजकीय फायदा घेतला हे तुम्हाला पण माहीत आहे. मी कौटुंबिक भावनेतून बोलत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबाबत गैरसमज निर्माण करून घेऊ नका. 100 वेळा आम्ही फोन केल्यावर जे ठाण्यात येत नाहीत, ते राजकारण करायला ठाण्यात आले, असे म्हणत प्रताप सरनाईक यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.








