मुलांना पिझ्झा आवडतो? पण तो तयार होणाऱ्या त्या स्वयंपाकघरातच जिवंत झुरळं आढळली तर? पुण्यात अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत डॉमिनोजच्या वारजेतील आउटलेटमध्ये जिवंत झुरळं (Pune FDA Action) आणि मृत झुरळं आढळली आहेत. एफडीएने पुणे विभागातील 25 हून अधिक आउटलेट्सची तपासणी केली, त्यातील वारजेच्या आउटलेटचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. अन्य दोन आउटलेट्समध्येही गंभीर त्रुटी (Pune FDA Action) आढळल्या आहेत. त्यामुळे साहजिकच मुलांना पिझ्झा खायला देणाऱ्या पालकांच्या चिंता वाढणार आहे. मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी पिझ्झा दिला जातो, पण तो बनवताना स्वच्छतेची किती काळजी घेतली जाते, मुलांच्या जीवाशी खेळ तर सुरु नाही ना? असे प्रश्न पुण्यातील कारवाईमुळे ऐरणीवर आले आहेत. कारण एफडीएच्या कारवाईत वारजेतील आउटलेटच्या स्वयंपाकघरात आणि अन्न साठवण्याच्या ठिकाणी जिवंत झुरळं, तसंच मृत झुरळांचे अवशेष आढळले.(Pune FDA Action)
इतकंच नाही, तर शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ हाताळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचं योग्य विभाजन नव्हतं. अन्नपदार्थ स्वीकारतानाच्या तापमानाच्या नोंदी अपूर्ण होत्या. स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचा अभाव, अन्नाची अस्वच्छ पद्धतीने साठवणूक आणि ग्राहकांच्या जेवणाच्या जागेतील स्वच्छतागृहातून दुर्गंधी येत असल्याचंही तपासणीत समोर आलं. या गंभीर त्रुटींमुळे वारजे येथील आउटलेटचा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला. तर अन्य दोन आउटलेट्सविरोधात दंडात्मक कारवाईसाठी न्यायनिर्णयनाची प्रकरणं दाखल करण्यात येणार आहेत. अन्न हाताळण्याच्या ठिकाणी झुरळं आणि अस्वच्छता आढळणं ही ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. विशेषतः लहान मुलांना बाहेरचं अन्न देताना पालकांनी स्वच्छतेकडे आणि अन्नसुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज या कारवाईतून अधोरेखित झाली आहे.(Pune FDA Action)
Pune FDA Action: वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित
स्वयंपाकघर आणि अन्नसाठवणूक ठिकाणी जिवंत झुरळे, तसेच मृत झुरळांचे अवशेष आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) वारजे येथील डॉमिनोज पिझ्झा आऊटलेटवर अन्न परवाना तत्काळ निलंबित केला आहे. यावेळी पुणे विभागातील डॉमिनोज पिझ्झाच्या 25 हून अधिक आऊटलेटची तपासणी करण्यात आली. यामध्ये अन्य दोन आऊटलेटमध्येही गंभीर त्रुटी आढळल्याने त्यांच्याविरुद्ध दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईसाठी प्रकरणे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एफडीए अधिकाऱ्यांनी दिली.
वारजे येथील मे. ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडच्या डॉमिनोज पिझ्झा आऊटलेटची मंगळवारी (दि. 13) अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी केली. या वेळी स्वयंपाकघर आणि अन्नसाठवणूक क्षेत्रात जिवंत झुरळे आणि मृत झुरळांचे अवशेष आढळले. त्यामुळे अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ हाताळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचे योग्य विलगीकरण नसल्याचे आढळले.








