अभिनेता अजय देवगण आणि जयदीप अहलावत यांचा ‘दृश्यम 3’ या चित्रपटगृहांमध्ये बंपर कमाई करत आहेत. मागील 12 दिवसांमध्ये सिनेमाने बंपर कमाई केली आहे, मागील 12 दिवसात सिनेमाने 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. या सिनेमाने 12 दिवसात बंपर कमाई केली आहे आणि त्याचबरोबर सिनेमाचे सोशल मिडियावर देखील भरभरुन कौतुक केले जात आहेत. या सिनेमाची कथा त्याचबरोबर सिनेमामधील कलाकारांच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहेत. या सिनेमामध्ये अभिनेता अजय देवगण आणि अभिनेता जयदीप अहलावत यांच्या जोडीने सिनेमा प्रेमींनी मने जिंकली आहेत. आता या सिनेमाने आतापर्यत किती कमाई केली आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
सॅकनिल्कच्या एका अहवालानुसार, सिनेमाने 12 व्या दिवशी केलेल्या कामगिरीनंतर कमाईमध्ये मोठी वाढ झाली आहे. ‘दृश्यम 3’ या सिनेमाला प्रदर्शित होऊन 13 दिवस पूर्ण झाले आहे, या सिनेमाने 12 व्या दिवशी 8.50 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाची प्रेक्षकसंख्या ही 18.0% होती, या सिनेमाच्या 12 व्या दिवशी 14,846 शोज झाले आहेत. चित्रपटाने 11 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 6 कोटी रुपये कमावले होते. आता, 12 व्या दिवशी त्याच्या कमाईत 2.5 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आठवड्याच्या दिवसांमध्येही चित्रपटाची कमाई वाढतच आहे. या सिनेमाच्या भारतामधील कमाईबद्दल सांगायचे झाले तर ‘दृश्यम 3’ ची एकूण देशांतर्गत बॉक्स ऑफिस कमाई ₹323.50 कोटींवर पोहोचली आहे.
अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ ने भारतात अवघ्या 12 दिवसांत 323.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाची भारतातील एकूण कमाई 387.80 कोटी रुपये झाली आहे. जगभरातील कमाईचा विचार केल्यास, चित्रपटाने जगभरात तब्बल 501.80 कोटी रुपये कमावले आहेत. केवळ 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, ज्यामुळे त्याचे निर्माते श्रीमंत झाले आहेत. यावर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही या चित्रपटाने आपले स्थान मिळवले आहे.
यामुळे, ‘दृश्यम ३’ या वर्षातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता तो केवळ ‘धुरंधर 2’ च्या लाईफटाईम कलेक्शनच्या मागे आहे. ‘धुरंधर द रिव्हेंज’ने जगभरात ₹1852.44 कोटींची कमाई केली होती. “दृश्यम: द कन्क्लुजन” ची निर्मिती स्टार स्टुडिओ आणि पॅनोरमा स्टुडिओ आणि अभिषेक पाठक यांनी केली आहे. या चित्रपटात विजय साळगावकरच्या भूमिकेत अजय देवगण, मीरा देशमुखच्या भूमिकेत तब्बू, नंदिनी साळगावकरच्या भूमिकेत श्रिया सरन आणि अंजू साळगावकरच्या भूमिकेत इशिता दत्ता आहे. जयदीप अहलावत यांनी पोलिस अधीक्षक राजवीर सिंग तोमरची भूमिका साकारली आहे.









