गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी वसईतील (Vasai News) सुरुची बीचवर फुटबॉल खेळताना समुद्रात बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय अंकित गुप्ताचा मृतदेह तब्बल १२ दिवसांनंतर काल सायंकाळी सापडला. पालघर जिल्ह्यातील घोलवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुजरात सीमेजवळील मोर्डी येथे समुद्रकिनारी अंकितचा मृतदेह आढळून आला. नायगाव येथील रश्मी परिसरात राहणारा अंकित गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी मित्रांसोबत सुरुची बीचवर (Vasai News) फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. खेळादरम्यान फुटबॉल समुद्राच्या पाण्यात गेल्यानंतर तो आणण्यासाठी अंकित पाण्यात उतरला. मात्र, समुद्राच्या जोरदार प्रवाहात तो वाहून गेला आणि बेपत्ता झाला. घटनेनंतर वसई पोलीस, अग्निशमन दल आणि भारतीय तटरक्षक दलाकडून सलग १२ दिवस समुद्र आणि किनारपट्टी परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. हेलिकॉप्टरच्या मदतीनेही अंकितचा शोध घेण्यात आला. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता.(Vasai News)
अखेर गणपती विसर्जनाच्या दिवशीच, गुजरात सीमेजवळ मोर्डी येथे अंकितचा मृतदेह सापडला. ज्या दिवशी बाप्पाचे आगमन झाले, त्याच दिवशी अंकित बेपत्ता झाला आणि बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी त्याचा मृतदेह सापडल्याने कुटुंबीयांचा १२ दिवसांचा शोध आणि प्रतीक्षा अखेर दुःखदरीत्या संपली.
Vasai News: समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही
गणेश चतुर्थीच्या दिवशी सुरुची बीचवर फुटबॉल आणण्यासाठी समुद्रात गेलेला १५ वर्षीय अंकित गुप्ता बेपत्ता झाला, आज बाराव्या दिवशी त्याचा मृतदेह आढळू आला आहे. नायगावच्या रश्मी परिसरातील रहिवासी असलेला अंकित १४ सप्टेंबर रोजी मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासाठी सुरुची बीचवर गेला होता. खेळताना फुटबॉल समुद्राच्या पाण्यात गेल्यानंतर तो तो आणण्यासाठी पाण्यात (Vasai News) उतरला. मात्र, भरतीच्या वेगवान प्रवाहात तो वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.(Vasai News) घटनेची माहिती मिळताच वसई पोलीस, अग्निशमन दल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या पथकांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली. समुद्रकिनाऱ्यासह समुद्रातील संभाव्य भागात बोटींच्या माध्यमातून शोध घेतला जात होता. तसेच हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हवाई शोधमोहीमही राबवण्यात येत होत्या.
Vasai News: १४ तारखेला सकाळी ५:५० वाजता अंकित घरातून निघाला…
अंकितचे काका धर्मेंद्र गुप्ता यांनी घटना घडल्यानंतर माध्यमांना माहिती देताना सांगितलं की, अंकित हा नायगाव ईस्ट येथील ‘रश्मी इंटरनॅशनल स्कूल’मध्ये ९वी इयत्तेत शिकत होता. तो नक्षत्र ग्रीन, बिल्डिंग नंबर ७, नायगाव येथे राहायचा. १४ तारखेला सकाळी ५:५० वाजता अंकित घरातून डॉन बॉस्को येथे फुटबॉल खेळायला जात असल्याचे सांगून निघाला होता. मित्रांच्या सांगण्यानुसार त्यांनी ओला (Ola) कॅब बुक केली आणि ते सुरची बीच (Surchi Beach) येथे गेले. मित्रांच्या दाव्यानुसार, खेळताना फुटबॉल आत गेला आणि तो काढण्यासाठी अंकित व त्याचे दोन साथीदार गेले. अंकित मोठा असल्याने पुढे गेला व त्याचा पाय घसरून तो पडला. १४ तारखेच्या सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास तो बेपत्ता झाला.






