भारत आज 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ला येथे राष्ट्रध्वज फडकावला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी सलग 13व्यांदा लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील युवकांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. तसंच, 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिंक खेळ भरवणार असल्याची मोठी घोषणादेखील त्यांनी केली. तसंच, त्यासाठी गावागावांत टॅलेंट हंट राबवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, ”आज भारत खेळाच्या दुनियेत आपलं स्थान मिर्माण करतोय. खेळाच्या पोडियममध्ये भारताचे राष्ट्रगान एकू येतेय. तिरंगा फडकवला जातोय. स्पोर्ट्स इन्फ्रा, स्पोर्ट्स कोचिंग, स्पोर्ट्स मेडिसन आणि स्पोर्ट्स न्युट्रिशयन या साऱ्या विषयात भारत पुढे येतोय. नवतरुणांसाठी नवीन क्षेत्र पुढे येतेय. खेळाडू होऊ न शकलेल्यांना पाठिंबा देण्यासाठीही नवीन क्षेत्र खुलं होतंय. खेळाच्या दुनियेत भारताचे प्रदर्शन चांगलं होतं. 2036मध्ये भारत ऑलिम्पिकचा मजबूत दावेदार म्हणून पुढे येतोय आणि 2030मध्ये कॉमनवेल्थ गेम भारतात होत आहेत.”
”जगात ऑलिम्पिकचे जे खेळ होतात. साधारण 40 प्रकारचे खेळ होतात आणि सव्वा तीनशे ते साडे तीनशे स्पर्धा असतात. नवतरुणांना व युवकांना मी आवाहन करतो, मला तुमची मदत पाहिजे… सव्वा तीनशे स्पर्धांमध्ये भारत दोन तृतीयांश खेळात कुठेच दिसत नाही. आपण कॉलिफायच होत नाही. 2036 मध्ये जे ऑलिम्पिक भारतात होईल. भारत ज्या खेळात कॉलिफाय होत नाही, ज्या स्पर्धात भारताने आशा सोडलीये. तीन तृतीयांश भाग आपली वाट पाहतोय. भारत त्यावर बळ देईल. त्यासाठी भारतभर टँलेट हट अभियान राबवणार,’ अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे.
‘जर आपल्याला २०३६ साठी खेळाडू हवे असतील, तर क्रीडा क्षमता ओळखण्यासाठी आजच गावोगाव, शहरोशहर, शाळा-शाळा फिरूनटॅलेंट हंट मोहीम राबवली जाईल. आपल्याला पाच ते पंधरा वयोगटातील मुलामुलींवर, विशेषतः आपल्या मुलींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यांच्या क्षमतांचे मूल्यांकन केले जाईल आणि त्यानंतर त्यांना देशाचे प्रतिनिधित्व करू शकतील अशा चांगल्या खेळाडू म्हणून घडवण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल,’ असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.सध्याच्या घडीला 5 ते 15 वर्षांपर्यंत वयोगटातील पिढीला जेन अल्फा म्हणून संबोधले जाते. त्यामुळं जनरेशन अल्फासाठी मोदींनी खास घोषणा केली आहे.
भारतातच तरुणांनी विदेशी पदवी: पंतप्रधान मोदी
‘2014च्या आधी 350 विद्यापीठे होती आता 1 हजार पर्यंत विद्यापीठ होत आहेत. भारतात विदेशी विद्यापीठ येत आहेत. भारतातच युवकांना परदेशी विद्यापीठाची डिग्री मिळेल. आपल्या देशातील युवक लहानपणांपासूनच टेक्नोलॉजीशी आकर्षिक होतील, यावर आम्ही काम करतोय. आम्ही स्टार्ट अप सुरू केले. तरुणांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग सुरू करणार. येणाऱ्या एका वर्षात 1 कोटी युवकाना एआय स्किलसाठी ट्रेनिंग देण्याचा काम करेन. आमच्या देशातील युवकही एआयच्या दुनियेत नेतृत्व करु शकेल,’ अशी मोठी घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.








