Search
Close this search box.

51 पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष सोडला, दुसऱ्या पक्षात जाहीर पक्ष प्रवेश, ठाकरेंना आणखी एक जबरदस्त धक्का!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात मोठी फूट पडली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे 7 खासदार फुटले आहेत. तर, आमदार आणि मुंबई महापालिकेतील नगरसवेक देखील फुटणार असल्याची चर्चा आहे. खळबळजनक राजकीय घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरे यांना आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे.  51 पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी ठाकरेंचा शिवसेना पक्ष सोडला आहे. या 51 जणांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठे धक्के बसत असताना आता वसईतील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. वसई विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाहीरपणे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

वसई पश्चिम येथील आमदार जनसंपर्क कार्यालयात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीत शाखाप्रमुख, विभागप्रमुख तसेच विविध पदांवर कार्यरत असलेल्या 50 हून अधिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे वसईतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून राजकीय वातावरण तापले आहे. वसई येथे झालेल्या सहकार पॅनलच्या प्रचार सभेत बहुजन विकास आघाडीचे प्रमुख व माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पक्षाशी बंडखोरी करून विरोधी पॅनलमधून निवडणूक लढवणारे माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांच्यावर तीव्र टीका केली.

“ज्यांना आपण सर्व काही दिले, तीच माणसे आज विरोधात उभी आहेत,” असे म्हणत ठाकूर यांनी राऊत यांच्यावर मतांसाठी कार्यकर्त्यांकडे याचना केल्याचा आरोप केला. तसेच “जे गेले ते मेले, आता कोणतीही तडजोड नाही,” असा इशारा देत त्यांनी भर सभेतच हार्दिक राऊत यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्याचे आदेश ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील यांना दिले
दरम्यान, ठाकूरांच्या आदेशानंतर राऊत यांच्यावरील कारवाईचे पत्र लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती काशिनाथ पाटील यांनी दिली. या घडामोडींमुळे टीडीसीसीची निवडणूक अधिकच प्रतिष्ठेची बनली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें