Search
Close this search box.

‘वांद्रे काय बांगलादेशच्या बॉर्डरवर आहे का?’, वरुण सरदेसाईंनी तोडक कारवाईनंतर विचारले महत्त्वाचे प्रश्न, ‘ही भाजपाची स्ट्रॅटेजी’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील गरीब नगर परिसरात रेल्वे रुळांलगतच्या 400 ते 500 अनधिकृत बांधकामांवर रेल्वे प्रशासन आणि महापालिकेकडून सलग दुसऱ्या दिवशी कारवाई सुरु आहे. बुलडोझरच्या साहाय्याने अनधिकृत बांधकाम पाडलं जात आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात असून, व कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान आज कारवाई करताना काही स्थानिकांनी विरोध केला. यादरम्यान पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

“कालपासून तोडक कारवाई सुरु झाली. गरीबनगर हा भाग वांद्रे पूर्व रेल्वे ट्रॅकला लागून असणारी वस्ती आहे. पश्चिम रेल्वेला इथल्या जमिनीवर रेल्वे ट्रॅक टाकायचे आहेत, जास्त ट्रेन सोडायच्या आहेत. वांद्रे टर्मिनस आणि स्थानक जोडायचं आहे. त्यासाठी ही जमीन आहे. ही जमीन रिकामी व्हावी यासाठी पश्चिम रेल्वे विरुद्ध गरिबनगरमधील रहिवासी असा खटला हायकोर्टात सुरु होता. निकाल आल्यानंतर हायकोर्टाने ही जागा रिकामी करण्यात यावी आणि अतीक्रमण हटवलं जावं सांगितलं आहे. परिणामी हायकोर्टाच्या निर्देशानुसार तोडक कारवाई करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे,” असं वरुण सरदेसाई यांनी सांगितलं.

‘चुकीचं नॅरेटीव्ह सेट केलं जात आहे’

“पण प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं. हिंदू मुस्लिम फॅक्टर आणणं ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे. पुन्हा एकदा त्यांनी प्रयत्न केला. जे काम पायाभूत सुविधांसाठी होणार होतं त्याला जातीचा, धर्माचा रंग देण्याचा प्रकार भाजपाकडून करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाचा महापौर झाला म्हणून, मुख्यमंत्र्यांच्या वतीने कारवाई करण्यात आली असं चुकीचं नॅरेटीव्ह सेट केलं जात आहे. वरुण सरदेसाईंना धक्का लागला असं सांगितलं जात आहे,” असा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला आहे.

मुद्दामून धार्मिक रंग दिला जात आहे

“2021 च्या सर्वेनुसार ज्यांचा सर्वे झाला त्यांचे अधिकार अबाधित ठेवावेत असं हायकोर्टाने सांगितलं.  तिथल्या रहिवाशांनी मला सांगितलं की सर्व घरांचा सर्व्हे झालेला नाही. आधीच्या आमदारांचं हे काम होतं की सर्व्हे पूर्ण करुन घ्यावा. पण ते तेव्हा निष्क्रियी होते. मी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि विकासाला विरोध नाही, वांद्रे पूर्व स्थानक स्वच्छ व्हावं असं सांगितलं. मी वारंवार यावर बोलत आहे. सर्वे झाला असता तर हायकोर्टाने ज्याप्रकारे 100 लोकांचे अधिकार अबाधित ठेवले तसंच इतरांचेही ठेवले असते. त्यांना घरं मिळाली असती. पण मुद्दामून त्याला धार्मिक रंग दिला जात आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.

‘किरीट सोमैय्या हीमॅन सारखे बुलेटप्रुफ जॅकेट घालून जातात’

पुढे ते म्हणाले, “काल हीमॅन सारखे बुलेटप्रुफ जॅकेट घालून किरीट सोमैय्या जातात. तिथे जाऊन बांगलादेशी घुसलेत म्हणतात. यांचा संबंध कुठे येतो. जर हे लोक बांगलादेशी होते तर मग घरं तोडल्यावर कुठे गेले? ही आता किरीट सोमय्यांची जबाबदारी नाही का? त्यांनी बांगलादेशसाठी ट्रेन केली आहे का? विमान केलंय, बस पाठवली? बांद्रा काय बांगलादेशच्या सीमेवर आहे का? 12 वर्षं मोदींचं सरकार असताना हे बांगलादेशी आले कसे? त्यांनी मतदानपत्र कसं मिळालं? त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? यांना रेशन कार्ड देणाऱ्यांवर कारवाई होणार का?”.

“आज जो काही लाठीचार्ज झाला आहे, यात लोकांची डोकी भडकवणा-यांवर अजित पवारांच्या पक्षाचे लोक आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. किरीट सोमैय्या यांवरही कारवाई व्हावी,” अशी मागणी वरुण सरदेसाई यांनी केला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें