चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनराइझर्स हैदराबाद यांच्यामध्ये महत्वाचा सामना चेपॅाकच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. या सामन्यामध्ये एसआरएचच्या संघाने बाजी मारली होती आणि प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. या सामन्यामध्ये एसआरएचचा फलंदाज हेनरिक क्लासेन आणि सीएसकेचा संजू सॅमसन यांच्यावर चालू सामन्यामध्ये बाचाबाची झाली होती. संजू सॅमसन याला त्याच्या चाहत्यांनी पहिल्यांदाच मैदानावर रागात पाहिले. सामन्यादरम्यान हेनरिक क्लासेन याला स्टंप आऊट केल्यानंतर या दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. यामध्ये आता दोन्ही खेळाडूंनी सोशल मिडियावर या वादा संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
संजू सॅमसनचे हेनरिक क्लासेनसोबतच्या वादावर स्पष्टीकरण
संजू सॅमसन याने त्याच्या सोशल मिडियावर दोघेही एकमेकांना मिठी मारतानाचा एक फोटो शेअर केला आहे यामध्ये त्याने लिहीले आहे की, मैदानावर अनेक गोष्टी घडत असतात, पण मैदानाबाहेर आमच्या दोघांमध्ये एकमेकांबद्दल खुप प्रेम आणि आदर असे त्याने लिहीले आहे. त्याने या फोटो आणि कॅप्शन लिहून यावर पार्श्वभूमीत २०२४ च्या तमिळ चित्रपट ‘मैय्याझगन’ मधील ‘द सायकल’ हे गाणे देखील लावले आहे.
हेनरिक क्लासेनची वादावर पोस्ट
सोशल मिडियावर हेनरिक क्लासेन याने लिहीले आहे की, खुप आदर आणि खुप प्रेम मित्रा. तुला पाहून नेहमीच चांगले वाटते, तु तुझे प्रयत्न करत रहा. आपण सर्व चांगले आहोत आणि आपल्यात सर्व चांगले आहे, तुझ्या पुढच्या आव्हानासाठी मी तयार आहे असे त्याने सांगितले आहे. या दोन्ही खेळाडूंनी सोशल मिडियावर मिठी मारतानाचा फोटो शेअर केला आहे, त्यामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानावरील वादानंतर आता सर्व काही ठिक असल्याचे दिसत आहे.
सीएसकेचा संघ आता जवळजवळ प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर झाला आहे, मागील सामना एसआरएचविरुद्ध गमावल्यानंतर संघाच्या प्लेऑफच्या आशा जवळजवळ नष्ट झाल्या आहेत. सीएसकेचा आता फक्त एक सामना शिल्लक आहे, त्यामुळे आता संघ हा एक लीग सामना खेळल्यानंतर स्पर्धेमधून बाहेर होणार आहे. रॅायल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स आणि सनराइझर्स हैदराबाद यांचे प्लेऑफचे स्थान पक्के झाले आहे.








