Search
Close this search box.

Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले जानकर हे ना माध्यमांमध्ये आहेत, ना कुठल्या राजकीय विषयावर आपली भूमिका मांडताना दिसून येतात. नुकते झालेल्या बारामती पोटनिवडणुकीत त्यांनी थेट काँग्रेसल बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराने येथून माघार घेतली. महादेव जानकर सध्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यात चक्क मेंढरांच्या वाड्यावर त्यांनी मुक्काम केला. माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू असताना, माण तालुक्यातील पांगरी येथे त्यांनी हा अनोखा अनुभव घेतला, त्यांचे रानात तळवं टाकून झोपलेले त्यांचे फोटो समोर आले आहेत. रासपचे माण तालुका युवक अध्यक्ष तात्याराम दडस यांच्या शेतात मेंढरांचा वाडा आहे. महादेव जानकर सध्या माढा मतदारसंघाचा दौरा करत असून ते पांगरी गावात पोहोचले असता, दडस यांच्या मेंढरांच्या वाड्यावर पोहोचले. मोकळ्या माळरानावर, मेंढपाळांसोबत जमिनीवर बसून त्यांनी मेंढपाळांसोबत मनमुराद गप्पा मारल्या, विशेष म्हणजे त्यांनी स्वतः मेंढपाळांसारखेच तीन दगडाच्या चुलीवरच्या भाकरी खाऊन, तिथेच रात्रीचा मुक्काम केला. आज मेंढपाळांसोबत या माळरानावर मुक्काम करताना मला माझ्या बालपणाची आठवण झाली. मी पुन्हा एकदा माझ्या त्या संघर्षमय जीवनाचा भाग झालो, असे त्यांनी यावेळी म्हटले. महादेव जानकरांनी शेतात, पालवर झोपून मेंढपाळांशी भावनिक नातं जोडल्याने माढा तालुक्यात आणि सोशल मीडियावर त्यांच्या साधेपणाचे फोटो व्हायरल झाले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें