Search
Close this search box.

Malshej Ghat Accident: माळशेज घाटात डेंजर अपघात! ST- स्कॉर्पिओची समोरासमोर धडक; चौघे जागीच ठार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटात भीषण अपघात झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस आणि स्कॉर्पिओ कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये काही प्रवाशी जखमी झाले असून जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे. हा अपघात दुपारी दोनच्या सुमारास घडला आहे. कल्याणवरुन आहिल्यानगरकडे जाणाऱ्या एसटी बसची कल्याणकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओला धडक बसल्यानंतर बस रस्तावरुन बाजूला झाली इतका हा भीषण अपघात होता.

काही दिवसांपूर्वीच 11 जणांचा मृत्यू

काही दिवसांपूर्वीच कल्याणजवळ एका अत्यंत भीषण अपघात झाला होता. कल्याण- मुरबाडदरम्यान पांजरा पुलावर झालेल्या भीषण अपघातामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झालेला. प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळ्या-पिवळ्या इको गाडीला सिमेंट मिक्सरने जोरदार धडक दिल्याने इकोमध्ये बसलेल्या सर्व 11 प्रवाशांचा मृत्यू झालेला. हा अपघात सकाळी 11 वाजून 15 मिनिटींनी घडला. इको गाडीमधून मुरबाडमधील काही रहिवाशी कल्याणच्या दिशेला जात असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये काळी-पिवळी चालवणाऱ्या चालकासहीत गाडीतील सर्वांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये महिलांचाही समावेश होता.

या मार्गावर एवढे अपघात का होतात?

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर अनेकदा असे मोठे अपघात होतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात या मार्गावर अपघात होण्यासाठी काही महत्त्वाची कारणं आहेत. या मार्गावरुन भाजीपाल्याचे पिकअप, ट्रक, बसची वर्दळ जास्त आहे. तसेच या मार्गावरील रस्ता काही भागामध्ये अरुंद आणि अत्यंत तीव्र वळणं असलेला आहे. काही ठिकाणी नदीवर पूल बांधले जात असल्याने संथ गतीने वाहतूक होत असते. अनेकजण नियम मोडून वाहनं चालवतात. अनेक वहानं ओव्हरस्पीडींग करतात. या ठिकाणी तासाला 80 किमी प्रती तास वेगमर्यादा आहे. ओव्हरलोडींग आणि बेकायदेशीरपणे या मार्गावरुन अनेक चालक गाड्या चालवतात. पावसाळ्याच्या दिवसात येथील रस्ता फारच धोकादायक होतो. कारण या ठिकाणी पथदिवे नाहीत तसेच घाटमार्गात कोसळणाऱ्या दरडींबरोबरच पावसाळ्यात येथील डांबरी रस्ता निसरडा होतो. महामार्ग चौपदरीकरण पुलाच्या कामामुळे अनेक ठिकाणी डायव्हर्जन करण्यात आलं आहे.

अपघातांचं सत्र अन् अनेक बळी…

26 जानेवारी रोजी जुन्नरमधील आणे येथे पिकअप आणि बोलरोचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकजण ठार झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. 12 फेब्रुवारी रोजी ओतूरमध्ये शाळेच्या एसटी बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये 15 विद्यार्थी जखमी झाले. मार्च 2025 मध्ये ओतूरजवळील उदापूर येथे एकाच दिवशी तीन अपघात झाले होते. या अपघांमध्ये 2 जण ठार झाले तर अनेकजण जखमी झालेले. जानेवारी ते जुलै या 2025 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये संपूर्ण आहिल्यानंतर कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर 31 अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये 20 जणांनी प्राण गमावला असून 30 जण जखमी झाले आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें