1 मेपासून राज्यात मराठी भाषेची सक्ती करण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या घोषणेनुसार रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं प्राथमिक ज्ञान असणं गरजेचं आहे. यामुळे चालकांमध्ये संतापाच वातावरण आहे. या सगळ्यावर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दिग्दर्शक आणि लेखक सचिन गोस्वामी यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे. ज्याची सगळीकडे चर्चा. महाराष्ट्रात रिक्षाचालकांनी राज्यवापी आंदोलन पुकारले असून संपावर जाण्याचा इशाराही दिला आहे. कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1मेपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची केली आहे. या सक्तीवरुन हे प्रकरण चिघळणार असून याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. 1 मे रोजी सक्तीच्या या नियमाला विरोध करत रिक्षा, टॅक्सी चालकांनी 4 मे रोजी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. या सगळ्यावर सर्वच स्तरावरुन प्रतिक्रिया येत आहेत. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे लेखक आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी या प्रकरणावर आपली ठाम भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले सचिन गोस्वामी?
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचे लेखक दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी रात्री उशिरा फेसबुकवरच एक पोस्ट शेअर करत आपली ठामपणे भूमिका व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, रिक्षा चालकाना तीन महिन्याचा व्यवहारउपयोगी मराठी शिकवण्याचा ऑनलाइन क्लास शासनाने तयार करून कंपलसरी करावा..तीन महिन्यांनी ऑनलाइन परीक्षा घेवून.पास झालेल्याचा रिक्षा परवाना कायम ठेवून,नापासना उत्तीर्ण होई पर्यंत परवाना निलंबित करावा. हीच पद्धत परभाषिक भाजी विक्रेते,रस्त्यावरील विक्रेते यांच्यात ही राबवता येईल. आपण नागरिकांनी सुद्धा व्यवहारात ठामपणे फक्त मराठीच बोलावे भाषा संवर्धना साठी हे आवश्यक आहे. महाराष्ट्रात मराठी आलं पाहिजे.
रा भाईंदरमध्ये गुणरत्न सदावर्ते यांना मनसेकडून विरोध होत आहे. मराठी भाषा सक्ती विरोधात सदावर्ते तेल ओतत असल्याचं मनसेचा आरोप आहे. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून सदावर्तींनी आमदार नरेंद्र मेहता यांची भेट घेतल्यानंतर मनसेकडून विरोध होत आहे. मीरा-भाईंदरच्या इंद्रलोक परिसरात मराठी विरोधात जमलेल्या रिक्षाचालकांची सदावर त्यांनी भेट घेतली या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी पोहोचवून त्यांना विरोध केला








