2025 या वर्षाला निरोप आणि नाताळचं सेलिब्रेशन करण्यासाठी कोकणात पर्यटक दाखल होत आहेत. पर्यटकांची संख्या वाढत आहे. कोकणातील समुद्र किनाऱ्यावर गर्दीची लाट उसळली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गत पर्यटकांची तुफान गर्दी पहायला मिळत आहे. अशातच रत्नागिरीत धक्कादायक घटना घडली आहे. रत्नागिरीत संपूर्ण कुटूंब समुद्रात बुडाले, मुंबईतून आलेल्या पर्यटकांचा अत्यंत भयानक मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाला गालबोट लागले आहे. समुद्रात पोहताना एकाच कुटुंबातील तिघे बुडाले आहेत. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील पवई येथून गुहागर मध्ये पर्यटनासाठी आले असताना समुद्रात पोहताना दुर्घटना घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे जण पाण्यात बुडाले आहे. पत्नी आणि 14 वर्षाच्या मुलाला स्थानिकांनी वाचवले. मात्र 42 वर्षीय अमोल मुथ्या यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अथक परिश्रमानंतरही अमोल यांना वाचण्यात स्थानिकांसह पोलिसांना अपयश आले. दुपारी एक वाजता ही घटना घडली. अमोल कुटुंबासह कोकणात फिरण्यासाठी आले. कुटुंबासोबतची ही ट्रीप त्यांच्या आयुष्यातील शेवटची ट्रीप ठरली. समुद्रावर पोहण्याचा आनंद लुटताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांची पत्नी आणि मुलगा वाचला आहे. दोघांनाही मोठा धक्का बसला आहे.
देशभरातील पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले असून जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळासोबत समुद्री पर्यटनाचा व समुद्री सहसी खेळांचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही गणपतीपुळे, भाट्ये, मांडवी या समुद्र किनाऱ्यासह विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे.
दरम्यान, सिंधुदुर्गात पर्यटकांची विक्रमी नोंद झाली आहे. सलगच्या सुट्ट्या आणि नव वर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली. तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील तीन दिवसात तब्बल पाच ते सहा लाख पर्यटकांनी भेट दिली.









