Search
Close this search box.

वरळीमध्ये ठाकरे सेना आणि भाजपमध्ये वाद; कामगार युनियनवरून दोन्ही पक्षात मोठा राडा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वरळीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मोठा राडा झाला आहे. कामगार युनियनवरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. वरळीतील सेट रेजिस हॉटेलमध्ये शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. भाजप मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने संघटना नोंद करत असल्याचा आरोप ठाकरेसेनेने केला आहे.

नेमकं काय झालं?

वरळीतील सेट रेजिस हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या राष्ट्रीय एकजूट कामगार संघटना हा फलकामुळे शिवसैनिक आक्रमक झालेत. त्यांनी ते फलक फाडून टाकले त्यामुळे तिथे उपस्थितीत असलेले भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. अशात ठाकरेंची शिवसेना आणि भाजप कार्यकर्ये आमने सामने आलेत. परिसरात राडा सुरु झाल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. एवढंच नाही तर कामगार युनियनवरून झालेला राडा शांत करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला.

 

दरम्यान काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा वाद बांद्रातील ताज लँड हॉटेलमध्येही झाला होता. त्यामुळे मुंबईतील कामगार संघटनांच्या नोंदणीवरून दोन्ही पक्षांमध्ये तणाव अधिक वाढताना दिवसेंदिवस दिसत आहेत.

भारतीय कामगार सेना काय म्हणते?

ठाकरेंच्या कामगार युनियनमधील काही कार्यकर्त्यांनी भाजप प्रणित अखिल भारतीय कर्मचारी संघात प्रवेश केल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव आहे. भाजपने महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फोडाफोडीचे राजकारण सुरु केलं असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे. अशातच ठाकरेंची भारतीय कामगार सेना चांगलीच आक्रमक झाल्याच पाहिला मिळत आहे. या वादावादी आणि राडादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करताना दिसून आलेत.

यावेळी मीडियाशी बोलताना भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी म्हणाले की, ठाकरेंसोबत कामगार कार्यकर्ते का राहत नाही, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवेत. त्यांचा आरोपाचे आम्ही खंडन करत आम्ही अशी कुठलीही फोडाफोडी करत नाहीत पण आता आम्ही शांत बसणार नाही, असंही ते यावेळी म्हणालेत.

सेंट रेजिसमध्ये भारतीय जनता पक्षाची यूनियन आमच्याकडे पहिलेपासून होता आणि आजही काही कार्यकर्ते आमच्याकडे आले. आमच्या युनियनचा बोर्ड लावण्याकरिता आम्ही आलो होतो जेणेकरून कामगारांचा युनियनशी चांगला संपर्क राहिला पाहिजे, हाच आमचा हेतू होता. त्यांच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवता आम्हाला खूप चांगल्या प्रकारे येतो. पण ठाकरे सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी उगीचच गोंधळ घालून वातावरण तणावपूर्ण केलं. भाजपने कोणतीही संघर्षाची भूमिका घेतलेली नाही, असं स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाची यूनियनकडून देण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा!

दरम्यान वरळीतील राडाबद्दल माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली असता त्यांनी, राडा करणाऱ्यांवर कारवाई करणार इशारा दिला आहे. सगळ्यांना कामगार युनियनमध्ये त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे काम करण्याचा अधिकार दिलेला असतो. संविधानानुसार सगळ्यांना मनाप्रमाणे काम करू द्यावे, असे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

admin
Author: admin

और पढ़ें