Search
Close this search box.

Shefali Jariwala Death: ‘रात्री 11 वाजता अचानक शरीर थरथरु लागलं अन्….’, पोलीस तपासात महत्त्वाचा उलगडा, ‘दुपारी इंजेक्शनने…’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Shefali Jariwala Death: ‘काँटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अचानक निधनामुळे मनोरंजनसृष्टीला मोठा धक्काला बसला आहे. हदयविकाराच्या झटक्याने शेफालीचं निधन झालं असल्याचं सांगितलं जात असून, पोलीस तपासात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. शेफालीच्या वयाच्या 42 व्या आकस्मिक निधन झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिला अंधेरीमधील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे रात्री उशिरा दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिला मृत घोषित केलं गेलं.

पोलीस तपासात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. ज्यामध्ये शेफाली मागील अनेक महिन्यांपासून अँटी एजिंग औषधं घेत होती. 27 जूनला घरी पूजा असल्याने शेफालीने उपवास ठेवला होता. मात्र यानंतरही तिने दुपारी अँटी एजिंग औषध इंजेक्ट केलं होतं. शेफालीने 7 ते 8 वर्षांपूर्वी एका डॉक्टरकडून अँटी एजिंग आणि विटॅमिनच्या औषधाचा सल्ला घेतला होता. यानंतर ती अनेक महिन्यांपासून ही औषधं घेत होती.

आतापर्यंतच्या पोलीस तपासात ह्रदयविकाराचा झटका आल्यानेच शेफालीचा मृत्यू झाल्याचं दिसत आहे. रात्री अचानक 10 ते 11 दरम्यान तिचं शऱीर अचानक थरथरु लागलं आणि ती खाली पडली. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. हे सर्व घडलं त्यावेळी घऱात शेफालीसह पती पराग आणि शेफालीची आई यांच्यासह काही अन्य लोक होते.

पोलिसांच्या एफएसएल टीमने शेफालीच्या घरातून अनेक औषधं जप्त केली आहेत, ज्यात अँटी-एजिंग व्हाईल्स, व्हिटॅमिन आणि गॅस्ट्रिक गोळ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात 8 लोकांचे जबाब नोंदवले आहेत, ज्यात कुटुंबातील सदस्य, नोकर आणि बेलेव्ह्यू हॉस्पिटलचे डॉक्टर यांचा समावेश आहे. आतापर्यंत तपासात कोणतीही संशयास्पद गोष्ट समोर आलेली नाही.

admin
Author: admin

और पढ़ें