शाळेच्या बस चालकाने 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना नवी मुंबईमध्ये घडली आहे. ही घटना शनिवारी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी गुरुवारी पनवेलमध्ये 3 मार्च रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलगी कॉलेजला जात असताना तिच्या शेजारी राहणाऱ्या आरोपीने तिला त्याच्या स्कूल व्हॅनमध्ये आमिष दाखवून नेले. या तरुणीला चिंचवडी शिवारा येथे निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे.
त्यांनी सांगितले की, पीडितेने गुरुवारी तिच्या पालकांना बलात्काराची माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्या व्यक्तीला 18 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
जोगेश्वरीत 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार
मुंबईच्या जोगेश्वरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 5 आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मुंबईतील जोगेश्वरी परिसरात तिच्या काकासोबत राहते. 24 फेब्रुवारी रोजी शाळेनंतर ती बेपत्ता झाली. पीडितेचा काका, जो व्यवसायाने ड्रायव्हर आहे, त्याने 26 फेब्रुवारी रोजी जोगेश्वरी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस
दरम्यान, पीडित मुलगी दादर रेल्वे स्थानकात फिरत असताना रेल्वे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तिची चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले आहेत. यानंतर दादर रेल्वे पोलिसांनी तात्काळ जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क साधला, पीडितेच्या जबाबानंतर आरोपीविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. जोगेश्वरी पोलिसांनी 5 आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर जोगेश्वरी पोलिसांनी अॅट्रॉसिटीच्या सर्व 5 आरोपींना अटक केली.
अटक केलेला आरोपी एसी मेकॅनिक आहे. शाळेनंतर मुलीला एकटी पाहून आरोपी तिला जोगेश्वरीच्या संजय नगर भागातील त्यांच्या घरी घेऊन गेले आणि तिच्यावर एकामागून एक बलात्कार केला. सध्या, जोगेश्वरी पोलिसांनी सर्व 5 आरोपींना अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. पीडित मुलाच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी पोलिस सीसीटीव्हीच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत.
