खेल

RR Vs RCB : आरआर फ्रँचायझीचं ‘पिंक प्रॉमिस’, क्रिकेट टीममुळे राजस्थान वासियांचं होणार भलं, पाहा काय होणार?

आयपीएल 2024 चा 19 वा सामना आज संध्याकाळी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RR Vs RCB) यांच्यात खेलवला जाणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. राजस्थान रॉयल्स सलग चौथा विजय नोंदवणार की बंगळुरू तिसरा पराभव स्विकारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आजचा सामना राजस्थानसाठी महत्त्वाचा असेल. या सामन्यासाठी आरआरने राजस्थान राज्यातील महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थानची नाविन्यपूर्ण कल्पना असं पिंक प्रॉमिस (Rajasthan Royals Pink Promise) आहे तरी काय?

RR ने कोणता निर्णय घेतला?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सामन्यादरम्यान प्रत्येक षटकारासाठी, राजस्थान रॉयल्स संपूर्ण राजस्थानमधील 6 घरांमध्ये सौर पॅनेल बसवणार आहे. पिंक प्रॉमिस अंतर्गत राजस्थान रॉयल्सने हा धडाकीचा निर्णय घेतला आहे. तसेच आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स खास गुलाबी रंगाची जर्सी घालेल. या जर्सीच्या विक्रीतून मिळणारी संपूर्ण रक्कम फाऊंडेशनला दान केली जाईल. तसेच सामन्यासाठी खरेदी केलेल्या प्रत्येक तिकिटासाठी 100 देणगी देण्याचं वचन देखील फ्रँचायझीकडून देण्यात आलं आहे. सामन्यापूर्वी होणाऱ्या उपक्रमात सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थानी महिला कलाकारांनी सादर केलेली कामगिरी, राजस्थानी वाळू कलाकाराने सौर पॅनेलद्वारे चालवलेल्या वाळूच्या कलेची निर्मिती, प्रतिष्ठानच्या महिला लाभार्थींची उपस्थिती आणि राजस्थानच्या प्रेरणादायी महिलांचा समावेश आहे.

आजच्या सामन्यातील निधीचा उपयोग महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात जागरूकता पसरवण्यासाठी आणि जमा झालेल्या निधीला महत्त्वाच्या कारणांसाठी वापरण्यासाठी राजस्थान रॉयल्सने पुढाकार घेतला आहे. राजस्थानची आजची जर्सी देखील खास असणार आहे. त्यावर महिलांचं प्रतिनिधित्व करणारी बांधणी करण्यात आली आहे. तसेच जर्सीवर पिवळ्या रंगीचं सूर्याचं प्रतिक असलेलं चिन्ह देखील आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, मयंक डागर, रीस टोपले, मोहम्मद सिराज, यश दयाल, महिपाल लोमरोर, सुयश प्रभुदेस, कर्ण शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंग, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ, विल जॅक्स, मनोज भंडागे, आकाश दीप, सौरव चौहान, राजन कुमार, हिमांशू शर्मा.

राजस्थान रॉयल्स संघ – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (C), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, कुलदीप सेन, शुभम दुबे, आबिद मुश्ताक, कुणाल सिंग राठौर, डोनोवन फरेरा, टॉम कोहलर-कॅडमोर, केशव महाराज, नवदीप सैनी, संदीप शर्मा.

Related Articles

Back to top button