देश

Gokul Price Increased : महागाईत आणखी एक झटका! अमूलनंतर गोकूळच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी चाप बसणार आहे. कारण अमूल कंपनीने (Amul Hikes Milk Prices) दूधदरवाढ केल्यानंतर आता गोकुळनेही (Gokul Price Increased ) आपल्या दुधात 3 रुपयांनी वाढ केली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून (गोकुळ) दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता म्हैशीचे दूध प्रतिलिटर 72 रुपयांवर झाले आहे.

इतक्या रूपयांनी वाढ
महागाईमुळे सर्वसामान्यांचे कबंरडे मोडले असताना आता नवीन दूध दर वाढीचा पुन्हा सामान्यांना भुर्दंड बसणार आहे. गोकुळ (Gokul Price Increased ) दूध संघाने गायीच्या दुधामध्ये प्रतिलीटर 2 रुपयांची वाढ केली आहे. तर म्हशीच्या दुधामागे प्रतिलीटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईत सध्या गाईचं दूध 54 रुपये दराने मिळत होतं. हेच दूध आता 58 रुपये प्रतिलीटर दराने मिळणार आहे.

दरम्यान गेल्या महिन्यातही गोकुळने गायीच्या आणि म्हशीच्या दूध दरात (Milk Price) वाढ केली होती. आता या महिन्यातही अचानक दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांना वाढीव दराचा फटका बसणार आहे. दुसरीकडे, दूध खरेदी दरातही वाढ केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा काहीसा फायदा होणार आहे. मुंबईत सध्या गोकुळच्या म्हैस दुधाचा दर प्रतिलिटर 69 रुपये इतका आहे. हेच दुध 72 रुपये दराने खरेदी करणार आहे. दुसरीकडे गायीचे दूध 54 रुपये प्रतिलीटर इतक्या दराने मिळत होते. तर गायीचे दूध 56 रुपये प्रतिलिटर दराने मिळणार आहे.

तर अमूल कंपनीने आठवडाभरापूर्वी दूध दरवाढ जाहीर केली होती. अमूलचे ताजे अर्धा लिटर दूध 27 रुपये तर एक लिटर पिशवी 54 रुपयांना केली. तसेच अमूल गोल्ड म्हणजे फूल क्रीम दूधाची अर्धा लिटरची पिशवी 33 रुपयांना तर एक लिटरची पिशवी 66 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली.

Related Articles

Back to top button