Search
Close this search box.

ITR भरण्याची शेवटची मुदत, चुकवली तर लागेल खिशाला कात्री! तारीख काय, कोण करू शकतो अर्ज?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

टॅक्स-ऑडिट भरणे बंधनकारक असणाऱ्या करदात्यांना आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची मुदत अगदी जवळ आली आहे. या करदात्यांकडे 21 नोव्हेंबरपर्यंतची अखेरची मुदत आहे. या तारखेपर्यंत विवरणपत्र न भरल्यास करदात्याला काही परिणामांना सामोरे जावे लागू शकते. परंतु लक्षात घेण्याची बाब म्हणजे ही मुदत फक्त काही विशेष करदात्यांनाच लागू आहे. सामान्य पगारदार करदात्याला 31 जुलैपर्यंत ITR दाखल करण्याची मुभा होती. तर टॅक्स ऑडिट बंधनकारक असणाऱ्या करदात्यांनाच या 21 नोव्हेंबरपर्यंतच्या मुदतीचा लाभ घेता येणार आहे.

कोणकोणत्या करदात्याला टॅक्स ऑडिट करणे बंधनकारक असते?

टॅक्स ऑडिट म्हणजे नोंदणीकृत सीए कडून आपल्या व्यवसायाच्या हिशोबांची तपासणी करून घेणे. या तपासणीनंतर संबंधित करदाता कंपनी/फर्म त्याला मंजूरी देते. नियमांनुसार, मुळात त्या करदात्यांना टॅक्स ऑडिट करण्याची गरज असते ज्यांची वार्षिक विक्री 1 कोटींपेक्षा जास्त आहे. डिजिटल व्यवसायांसाठी ही मर्यादा 10 कोटींपेक्षा जास्त आहे. तर डॉक्टर, वकील अशा पेशेदारांचे वार्षिक उत्पन्ना जर 50 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्यांना टॅक्स ऑडिट करणे बंधनकारक असते. अनेकदा नफ्यावर लागणारे कर वाचवण्यासाठी काही कंपन्या कमी नफा दाखवतात, पण टॅक्स ऑडिटच्या प्रक्रियेमुळे खऱ्या हिशोबाचा सोक्षमोक्ष होतो. मुळात टॅक्स ऑडिट करणे बंधनकारक असणाऱ्या कंपन्या, फर्म्स् तसेच इतर पात्र पेशेदारांना 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत ITR दाखल करण्याची मुभा आहे.

21 नोव्हेंबरच्या आधी करदात्याने काय तपासावे?

कर वाचवण्यासाठी कंपनीने हिशोबात केलेले फेरबदल उघडकीस आणण्यासाठी टॅक्स ऑडिट केले जाते. त्यामुळे या श्रेणीत मोडणाऱ्या प्रत्येक करदात्याला ते करणे बंधनकारक असतेच. पण या प्रक्रियेवर स्वतःचीही देखरेख असावी. ITR दाखल करण्याअगोदर हे व्यवहार किमान दोनदा तरी स्वतःहून तपासून घ्यावेत, जेणेकरून चुका टाळता येतील. त्याचबरोबर त्याला आधार देणारे इतर दस्तऐवज बरोबर आहेत का, याचीही खात्री करून घ्यावी.

admin
Author: admin

और पढ़ें