महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागात मोठे फरेबदल झाले आहेत. महाराष्ट्रातील 3 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. प्रशासन विभागाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाही केले आहेत.
3 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
1 संजय खंडारे (आयएएस:आरआर:१९९६), अतिरिक्त मुख्य सचिव (पर्यटन), पर्यटन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वन), वन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.
2 संजय यादव (आयएएस:एससीएस:२००९), राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई यांची सचिव (पर्यटन), पर्यटन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.
3 वैष्णवी बी. (आयएएस:आरआर:२०१९) यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर येथे बदली झाली आहे.
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरुच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्या पासून प्रशासनात मोठे फेरबदल होत आहेत. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता रहावी यासाठी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. यापूर्वी देखील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
तुकाराम मुंढेंच्या कामगिरीचा जगभरात डंका
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामगिरीचा जगभरात डंका सुरू. शहरांपासून गावांमध्येदेखील तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखालील FDA नं छापे टाकून अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांच्या आणि पुरेशी स्वच्छता न बाळगणाऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या कामगिरीचा डंका फक्त महाराष्ट्रभरच नव्हे, तर देशभर आणि आता विदेशातही वाजू लागला आहे. अमेरिकेतील आघाडीचे वर्तमानपत्र द न्यूयॉर्क टाईम्सने तुकाराम मुंढेंना आपल्या फ्रंट पेजवर स्थान दिलं असून त्यांचा उल्लेख ‘रॉकस्टार’ असा केला आहे.राज्यभरातल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धसका घेतला आहे. हॉटेल्स, रेस्तराँ, दुकानदार अशा सर्वांनीच आपल्या खाद्यपदार्थांचा व किचनमधील स्वच्छतेचा दर्जा वाढवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या याच कामगिरीचं कौतुक न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या बातमीमध्ये करण्यात आलं आहे.








