Search
Close this search box.

Tukaram Mundhe : गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या विभागानं केलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी राज्यात 3100 आस्थापनांची तपासणी करण्यात आल्याचं मुंढे यांनी म्हटलं.याच पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांना गणेशोत्सवात (Ganesh Festival) गणेश मंडळातपर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसाद  आणि भंडाऱ्याच्या आयोजनासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मुंढे यांनी एफडीएची भूमिका स्पष्ट केली आहे.

गणेशोत्सवात महाप्रसादासाठी नवा नियम आहे?

तुकाराम मंढे यांना गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळातर्फे महाप्रसाद आणि भंडाऱ्याचे आयोजन केले जाते तर त्याकडे तुमचे लक्षं असेल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले कीआपण सर्वांनी एक समजून घेतलं पाहिजे की , हे काही महाप्रसाद, भंडारा किंवा सण-उत्सव, ईद, गणेशोत्सव याबाबत नाही. इट इज अबाऊट रेग्युलेशन्स. हे नियमानुसार होतंय का याबाबत आहे, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

रेग्युलेशन्समध्ये फूड बिझनेसेसमध्ये प्रत्येकाने रजिस्टर्ड लायसन्स करणे अपेक्षित आहे. जे स्टँडर्ड रेग्युलेशन जे आधीपासूनचे आहेत ते पाळावे, यामध्ये नवं असं काहीच नाही. त्यामुळे जिथे जिथे विनापरवाना, विना स्टँडर्ड, विदाऊट प्रोटोकॉल असेल, तर ते नियमभंग करत आहेत. मग ते फेस्टिव्ह सीजन असो वा नसो, ते महत्त्वाचं नाही. प्रत्येक फूड बिझनेस ऑपरेटरने लायसन्स घेतलं पाहिजे, रजिस्टर्ड पाहिजे, स्टँडर्ड रेग्युलेशनने ते पुरवलं पाहिजे..ही रुटीन प्रोसेस आहे, फेस्टिव्ह सीजन म्हणून नाही, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

एफडीएकडून 3100 ठिकाणी तपासणी

अन्न व औषध प्रशासनानकडून 31 जुलैपर्यंत अन्न क्षेत्रातील 3 हजार 100 हून अधिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान 165 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. 750 हून अधिक आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली आहे. निलंबित परवान्यांपैकी सुमारे 105 जणांनी FDA आयुक्तांकडे अपील केलं, अपील केलेल्या प्रकरणांपैकी सुमारे 70 आस्थापनांना दिलासा देण्यात आला आहे,उर्वरित प्रकरणांमध्ये अंतिम आदेशाची प्रक्रिया सुरू असल्याचं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं.

नियमांचं पालन केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून पुन्हा तपासणी आणि पडताळणी करण्यात येईल. सुधारणा समाधानकारक आढळल्यास निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला जाईल. नियमांचं पालन न झाल्यास निलंबन कायम ठेवून पुढील कारवाई केली जाईल. सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असेल तरच परवाना तात्काळ निलंबित अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.

कारवाईनंतर अनेक रेस्टॉरंट्सकडून स्वतःहून सुधारणा आणि किचनचं नूतनीकरण केलं जातंय.काही रेस्टॉरंट्सनी ठराविक कालावधीनंतर स्वतःहून किचन बंद ठेवून स्वच्छता आणि सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध शहरं आणि ग्रामीण भागातून खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेत बदल झाला आहे. तेल, खाद्यपदार्थांचे रंग आणि दुधाच्या चवीत बदल झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रियांसाठी भविष्यात औपचारिक फीडबॅक यंत्रणा उभारण्याचा FDAचा विचार आहे.’व्यावसायिकांनी नियमांचं पालन केलं तर नियामकाची गरजच उरणार नाही’ असं तुकाराम मुंढेंनी म्हटलं.

admin
Author: admin

और पढ़ें