Search
Close this search box.

यंदा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान मोजक्या वारकऱ्यांच्याच उपस्थितीत; इंद्रायणीला आलेल्या पुरामुळं निर्णय

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आषाढी एकादशी वारीनिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान 8 जुलै रोजी होत आहे. यंदा माऊलींच्या पालखी साठी नवीन रथ तयार करण्यात आला आहे. त्याची विधिवत पूजा होणं अपेक्षित होतं. मात्र, मुसळधार पाऊस आणि इंद्रायणी नदीला आलेला पूर यांमुळ मंदिर समितीनं हा कार्यक्रम रद्द केला आहे. दरम्यान वारी साठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल होत असतात. मात्र इंद्रायणी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने कोणीही पुलावरून येऊ नये असं आवाहन पोलीस आणि नगरपरिषदेने केलं आहे.

इंद्रायणीला आलेल्या पुरामुळं आळंदीत जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. आळंदीचा पुराचा वेढा पडल्यानं वारकऱ्यांची मोठी गैरसोय झालीय. दरम्यानच्या काळात यंत्रणांच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी पालखी सोहळा प्रमुखांनीही वारकऱ्यांना आळंदीत न येता आहात त्या ठिकाणी सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं. इतकंच नव्हे तर पावसाची स्थिती पाहचा पालखी सोहळा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थिती पार पाडला जाण्यासंदर्भातील निर्णयसुद्धा घेतला.

वारकरी भाविक भक्तगण यांना जाहीर नम्र निवेदन… 

मुसळधार पावसामुळं श्रीक्षेत्र आळंदी इथं इंद्रायणी नदीने धोकादायक पाणी पातळी ओलांडली आहे. त्यामुळे इंद्रायणी परिसरातील सर्व घाट पाण्याखाली गेले आहेत हे निदर्शनास आणून देत इंद्रापूलावरील कठडे, लाईटचे खांब वाहून गेले आहेत. आळंदी नगरपरिषदेचे वॉटरवर्क्स पूर्णपणे पाण्याखाली गेले असून, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठप्प आहे, इतकंच नव्हे तर, पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांच्या दर्शनव्यवस्थेसाठी उभारलेली दर्शनबारीदेखील पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. सोहळ्याच्या रथाला खेचणारे बैलांचे मोबाईल टॉवरदेखील पुरात वाहून गेले असून लाईट बंद आहेत असं सांगताना आळंदीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था करणे शक्य नाही असं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

निवाऱ्याची सोयही करता येत नसल्यानं संस्थान कमिटीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी मंदिरातून होणारा सोहळा मर्यादित लोकांमध्ये संपन्न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये माऊलीच्या रथासाठी घोडे 9 ते 25 वारकरी, बिडी क्र. 1 ते 3 (एकूण प्रवेश सुमारे 45), मंदिर प्रवेशी 50 वारकरी असे एकूण 95 वारकरी आणि पारंपरिक दिंडीप्रमुख, मानकरी सेवेकरी, प्रतिष्ठित यांना नामनिराळ्यासाठी एकूण 500 व्यक्तींना प्रवेश दिला जाईल असं सांगितलं. अध्क्ष, सेवेकरी, कर्मचारी, आरोग्य, महसूल, पोलीस अशा एकूण 1650 व्यक्तींच्या पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार असल्याची बाबसुद्धा स्पष्ट करण्यात आली.

पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीमध्ये न आहात त्या सुरक्षित ठिकाणहून पालखी सोहळ्यात सहभागी व्हा, असं आवाहन स्थानिक प्रशासनानं नागरिक आणि वारकऱ्यांना केलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें