Search
Close this search box.

Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्यभरात पावसाचा जोर कायम असताना मुंबईमध्ये देखील आज सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने जोर कायम ठेवला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भाग पूर्णपणे भिजून निघाले असून, आजही पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे नाहीत. हवामान विभागाने मुंबईसाठी आज रेड अलर्ट जारी केला असून, दिवसभरात काही ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क केल्या असून, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, सखल भाग, समुद्रकिनारे आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Mumbai News: मुंबईत गेल्या 24 तासांत मुसधार, 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद

दरम्यान, आजचा दिवस मुंबईकरांसाठी महत्त्वाचा ठरणार असून, हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे संपूर्ण यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून शहर आणि उपनगरांतील अनेक भागांमध्ये 100 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही तासही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महापालिकेच्या पर्जन्यमापन केंद्रांनुसार, सर्वाधिक 146.4 मिमी पावसाची नोंद एच-पश्चिम प्रभाग कार्यालयात झाली आहे.

Mumbai News: पुढील काही तासांतही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

दरम्यान, त्याखालोखाल सुपारी टाकी महापालिका शाळा, वांद्रे येथे 143.4 मिमी, पाली मुंबई महापालिका शाळा, वांद्रे येथे 140.6 मिमी, जी-दक्षिण प्रभाग कार्यालयात 140.2 मिमी, तर एफ-उत्तर प्रभाग कार्यालयात 132 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मानखुर्द अग्निशमन केंद्रात 126.8 मिमी, कलेक्टर कॉलनी, चेंबूर येथे 124.2 मिमी, महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथे 120.8 मिमी, तर रमाबाई नगर, घाटकोपर येथे 120.2 मिमी पाऊस झाला. हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Rain News: मुंबईसह आज कुठे-कुठे रेड अलर्ट?

महाराष्ट्रात 4 ते 7 जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असून काम असेल तर घराबाहेर पडा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहेसंभाव्य परिस्थिती पाहता मुंबईतील पालिका आणि आपत्ती व्यवस्थापन सर्व यंत्रणा हाय अलर्टवर आली आहे. मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस कोसळला आहेतर मुंबई आणि ठाण्याला आज आणि उद्या रेड अलर्ट आहेयासह, ठाणे, पुणे घाटमाथा, पालघर, सातारा, रायगड या जिल्ह्यांना देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेल्पलाईन क्रमांक जारी

बृहृन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 1916

पालघर हेल्पलाईन क्रमांक – 02525 297474, +91 82379 78873

ठाणे महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 022-25364779, 0222530 1740, 91 93723 38827,

ठाणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101

पनवेल महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 02227458040/41/42

Thane Rain : ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, आजही धोधो बरसणार

दुसरीकडे, ठाणे शहरात काल (3 जुलै) सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेपाच पर्यंत 58 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहेआज पहाटेपासून अधून मधून मुसळधार पावसाच्या सरी ठाण्यामध्ये पडताना पाहायला मिळत आहेत. तर हवामान विभागाकडून आज आणि उद्या ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें