Search
Close this search box.

लोकल ट्रेन हत्याकांडात सर्वात मोठा खुलासा! आरोपी रोशन ऑफिसच्या बॅगेत चाकू घेऊन का फिरत होता? समोर आलं खरं कारण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चर्चगेट-नालासोपारा लोकलमधील 22 वर्षीय प्रवासी मयंक लोहार हत्या प्रकरणातील आरोपी रोशन सुवर्णा हा गेल्या दोन महिन्यांपासून बॅगेत चाकू घेऊन प्रवास करत असल्याचे त्याच्या चौकशीत समोर आले. पोलिस आता याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. रोशनला 30 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी रोशनच्या ऑफिसच्या बॅगेत चाकू का होता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.

दरवाजा बंद करण्यावरुन वाद

 

घटनेच्या दिवशी दरवाजा बंद कारण्यावरून मयंक आणि रोशन यांच्यात वाद झाला. तो टोकाला गेला. त्यानंतर त्याने मयंकवर चाकूने सपासप वार केले. त्याने पोलिसांना दिलेल्या कबुलीत, मयंकने त्याला मारहाण केली म्हणून संताप अनावर झाला आणि बॅगेतल्या चाकूने त्याच्यावर वार केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, बॅगेत चाकू का? याबाबतचे गूढ कायम आहे.

बॅगेत चाकू का ठेवला होता 

पोलीस तपासात रोशनने दीड ते दोन महिन्यांपूर्वीच तो चाकू खरेदी केला होता, अशी माहिती दिली. रोशनने तो चाकू घरी वापरण्यासाठी घेतला होता, असा दावा केला आहे. मात्र, तो चाकू बॅगेतून काढून घरी ठेवायचे राहून गेले, अशी माहिती पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबामध्ये दिली आहे. मात्र रोशनच्या या दाव्याबाबत पोलिसांना संशय असून, त्याची चौकशी सुरू आहे. त्याचा कुठलाही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. घटनेच्या दिवशी रोशन दारूच्या नसेत असल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.

शर्टच्या लोगोवरून घेतला शोध

घटनेच्या दिवशी आणि नंतर आरोपी रोशन सुवर्णा हा कुठून आला आणि कुठे गेला, हे तपासण्यासाठी दोन वेगवेगळ्या टीम काम करत होत्या. त्याच्या शर्टच्या मागे असलेल्या लोगोवरून तो स्थानकात नेमका कुठून, कसा आला, याचा शोध सुरू असताना रिक्षाचा नंबर मिळाला. पुढे रिक्षाने तो अंधेरी कार्गो भागातून आल्याचे स्पष्ट झाले. तिथे त्याचे फोटो दाखवताच तो ‘बारकोड’ लावणारा रोशन असल्याची माहिती पथकाला मिळाली.

रोशन भाऊ, वडिलांसोबत करायचा काम

रोशन हा मिरा रोडच्या साईबाबानगर येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी रेल्वे पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू केली आहे. तो 2022 पासून कुटुंबासह भाडेतत्त्वावर येथे राहत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि मोठा भाऊ असून, वडील रमेश सुवर्णा मुंबईतील डॉक परिसरात पॅकिंगचे काम करतात. रोशन आणि त्याचा मोठा भाऊही त्यांच्यासोबत काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

रोशनच्या नावावर घराचा भाडेकरार

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब शांत स्वभावाचे होते, गेल्या काही वर्षांत त्यांचा परिसरातील नागरिकांशी फारसा संपर्क नव्हता. विशेष म्हणजे, नुकतेच रोशनच्या नावावर पुढील तीन वर्षांसाठी घराचा भाडेकरार करण्यात आला होता, घटनेच्या दिवशी तो घरी आला होता. जेवण करून काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर तो पहाटे घराबाहेर पडला होता.

admin
Author: admin

और पढ़ें