Search
Close this search box.

हवामान खात्याचा अंदाज अखेर खरा ठरला! महाराष्ट्राचा तब्बल 80 टक्के प्रदेश मान्सूनने पादाक्रांत केला; 3 दिवस तुफान पावसाचा अलर्ट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 हवामान खात्याचा अंदाज अखरे खरा ठरला आहे. 15 दिवसांपासून खोळंबलेला मान्सून अखेर सक्रिय झाला आहे. राज्यभरात पावसाने दमदार एन्ट्री मारली आहे. ग्राणीण भागासह मुंबई, पुणे सारख्या शहरी भागात देखील पावासाचे आगमन झाले आहे. महाराष्ट्राचा तब्बल 80 टक्के प्रदेश मान्सूने पादाक्रांत केला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. कोकण आणि पश्चिम घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 3 दिवस तुफान पावसाचा इशराा देण्यात आला आहे.

येत्या दोन तीन दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकणार

राज्यात आता कुठे मान्सून सर्वदूर सक्रिय झाला आहे. अगदी काल परवा पर्यंत तब्बल 14 दिवसांचा मान्सून अवघ्या 48 तासात थेट मुंबईत जाऊन धडकला आहे.अरबी समुद्रात मान्सूनचे वारे वाहू लागल्याने 25, 26 आणि 27 तारखेला राज्यात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. 48 तासांसाठी  कोकण आणि पश्चिम घाट माथ्यावर रेड अलर्ट तर उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्राचा तब्बल 80 टक्के प्रदेश मान्सून पादाक्रांत केला असून येत्या दोन तीन दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल. पुणे वेधशाळेचे संचालक डॉ. एस डी सानप यांनी ही माहिती दिली.

जून अखेरीस मान्सून मुंबईत दाखल 

दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर आज मान्सुन मुंबईत दाखल झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं आगमन अपेक्षीत असतं. मात्र, यंदा जून अखेरीस मान्सून दाखल झाला. त्यामुळे पावासकडे डोळे लावून बसलेल्या प्रत्येकाला दिलासा मिळाला. मुंबईसह उपनगरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं, पावसाच्या आगमनानं या पावसाळ्यात मुंबईला पाणीपुरवठा करण्याऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊल कोसळण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मागील काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने तळकोकणात लावलीय दमदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात पावसाची संततधार सुरु.  ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले.

15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात पाऊस परतला, शेतकऱ्यांना दिलासा

गेल्या 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात पाऊस परतलाय. राज्याच्या अनेक भागात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. वरुणराजाच्या आगमनामुळे बळीराजासह सर्वच नागरिक सुखावले आहेत. पुणे, बुलढाणा, हिंगोलीत जोरदार पाऊस बरसलाय…तर कोकणातही आनंदसरींचा वर्षाव सुरु झाला. पुण्यातील जुन्नरमध्ये तर ढगफुटीसदृश पाऊस पडला.पहिल्याच पावसात शहरातील रस्ते जलमय झाले होते. संभाजीनगर, बुलढाण्यातही पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळे आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येईल. पुढेही वरुणराजाने अशीच कृपादृष्टी ठेवली तर रखडलेल्या पेरण्या मार्गी लागती.

admin
Author: admin

और पढ़ें