Search
Close this search box.

मुंबईचा पाणीसाठा 90%, तरीही शहरातील पाणी कपात लागूच राहणार, कारण….; पालिकेने सांगितले कारण!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जुलै महिन्यात राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळं पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये पाठीसाठा वाढला आहे. जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरी मुंबईत सुरू असलेली पाणी कपात लागुच राहणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव 100 टक्के भरले तरीही प्रशासन सावधगिरीच्या भूमीकेत, काही काळ ‘वेट अँड वॉच’ची भूमिका राहणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील एकूण जलसाठा 90.06 टक्क्यांवर गेला असला तरी सध्या सुरू असलेली पाणी कपात तातडीने रद्द होण्याची शक्यता नाही.

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावात एकूण जलसाठा 13.03 लाख दशलक्ष लिटर इतका जमा आहे. मोडक सागर, विहार आणि तुळशी तलाव 100% भरले, तर तानसा 99.58% क्षमतेपर्यंत भरले आहेत. महापालिका पुढील काही आठवड्यांतील पाऊस, तलावांतील आवक आणि पुढील वर्षभराच्या पाणी उपलब्धतेचा अंदाज घेऊनच निर्णय घेणार. सध्या वाढलेला जलसाठा मुंबईकरांसाठी दिलासादायक असला तरी पाणी कपात हटवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय अपेक्षित नाही, असं समोर येतंय.

मागील वर्षांच्या तुलनेत जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे.पाणी कपातीबाबत सद्यस्थितीधरणे भरली असली तरी प्रशासनाकडून संपूर्ण पावसाळ्याचा आढावा घेतला जात आहे.धरणातील साठा पूर्ण 100% होईपर्यंत किंवा सप्टेंबर अखेरपर्यंत खबरदारी म्हणून लागू असलेली पाणीकपात पूर्णपणे मागे घेण्याबाबतचा निर्णय विचारधीन आहे

 

जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरणांनी तळ गाठला होता. यंदा 4 जुलै रोजी धरणात 9 टक्के पाणीसाठा असताना गतवर्षी त्याच दिवशी धरणे 50.75 टक्के भरली होती. जुलैच्या शेवटच्या दिवसांमधील मुसळधार पावसाने पाणीचिंता दूर केली. मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात धरणांतून दरदिवशी सुमारे 4000 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो.

कोणत्या धरणांत किती पाणीसाठा? 

मोडक सागर 100.00%
विहार 100.00%
तुळशी 100.00%
तानसा 99.58%
मिडल वैतरणा 92.15%
भातसा 88.43%
अप्पर वैतरणा 80.14%

admin
Author: admin

और पढ़ें