Search
Close this search box.

‘लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून उतरा अन् थेट मेट्रोत चढा’; ‘या’ 2 मेट्रो मार्गांशी एकाच वेळी कनेक्ट होणार ट्रेन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करुन आल्यानंतर भरपूर सामना सोबत असताना टॅक्सी शोधण्यासाठी किंवा बसने गेल्यास बससाठीही बराच वेळ वाट पहावी लागते. आधीच प्रवासाचा क्षीण त्यात हा स्टेशनपासूनचा घरापर्यंतचा दिव्य प्रवास अगदी नकोसा होतो. मात्र आता लवकरच मुंबईकरांना लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून उतरल्यानंतर थेट मेट्रोने घरापर्यंत पोहोचता येणार आहे. यासंदर्भातील काम रेल्वेने सुरु केलं असून हा मुंबईकरांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. नेमका हा प्रकल्प कुठे साकारलाी जातोय आणि तो कसा आहे हे जाणून घेऊयात…

योजना सध्या अंतिम टप्प्यात

 

‘ट्रेनमधून उतरा आणि थेट मेट्रोत चढा’ तत्वावरील हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे तो, जोगेश्वरी टर्मिनस स्थानकावर! जोगेश्वरी टर्मिनस मुंबई मेट्रो नेटवर्कशी जोडण्याच्या दृष्टीनेही पश्चिम रेल्वेने तयारी केली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांना थेट लोकल सोबतच मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही योजना सध्या अंतिम टप्प्यात असून, ती पूर्ण झाल्यावर या टर्मिनसला मेट्रो मार्ग क्रमांक 6 आणि 7 अ सोबत थेट जोडणे शक्य होणार आहे.

एस्केलेटर, लिफ्ट आणि….

मुंबई उपनगरीय रेल्वे वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या नव्या कोचिंग टर्मिनलच्या उभारणीचे काम जोगेश्वरी रेल्वे स्थानक परिसरात वेगाने सुरू आहे. या टर्मिनलमध्ये सुरुवातीला तीन प्लॅटफॉर्म उभारण्यात येत असून, भविष्यातील वाढत्या रेल्वे वाहतुकीचा विचार करून आणखी दोन अतिरिक्त प्लॅटफॉर्मची तरतूद करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकात प्रत्येकी 6 मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल (एफओबी) बांधण्यात येत आहेत. या पुलांवर प्रवाशांच्या सुलभ हालचालीसाठी प्रत्येकी तीन एस्केलेटर आणि तीन लिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांसह सर्व प्रवाशांना स्थानकात सहज व सुरक्षितपणे वावरता येणार आहे.

मेट्रोशी थेट जोडणी

एमएमआरडीएच्या मल्टी-मोडल इंटिग्रेशन योजनेंतर्गत जोगेश्वरी टर्मिनसला मेट्रो मार्ग क्रमांक 6 (स्वामी समर्थ नगर-विक्रोळी) आणि मेट्रो मार्ग क्रमांक 7 (दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व) यांच्याशी जोडण्यात येणार आहे. मेट्रो-6 चा मार्ग टर्मिनसच्या जवळून जात असून, मेट्रो-7 साठी राम मंदिर आणि जोगेश्वरी परिसरातून इंटरचेंज सुविधा उपलब्ध होणार आहे.

पश्चिम उपनगरांना फायदा

सध्या गोरेगाव मेट्रो स्थानक आणि राम मंदिर रेल्वे स्थानक यांच्यातील जोडणीचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. त्याचवेळी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाकडून राम मंदिर स्थानक ते जोगेश्वरी टर्मिनस दरम्यान स्कायवॉक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जोगेश्वरी टर्मिनस, राम मंदिर रेल्वे स्थानक आणि गोरेगाव मेट्रो स्थानक यांच्यात अखंड पादचारी जोडणी उपलब्ध होणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरांतील रेल्वे वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.

पहिला टप्पा 2027 पर्यंत सुरू?

रेल्वे आणि एमएमआरडीए संयुक्तपणे या प्रकल्पावर काम करत असून, जोगेश्वरी टर्मिनसचा पहिला टप्पा 2027 पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जोगेश्वरी हे केवळ रेल्वे टर्मिनस न राहता मुंबईतील महत्त्वाचे ट्रान्झिट आणि इंटस्चेंज हब म्हणून उदयास येणार आहे. त्याच दृष्टीने सध्या जोगेश्वरी टर्मिनस स्थानकावर काम सुरु आहे.

admin
Author: admin

और पढ़ें