मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे रुळांची देखभाल, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी शनिवारी 30 मे आणि रविवार, 31 मे रोजी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या विस्कळीत मार्गाने किंवा विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे सुधारित वेळापत्रक तपासावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
पश्चिम रेल्वेच्या मरीन लाइन्स स्थानकात पादचारी पुलाचे (एफओबी) गर्डर लाँचिंगचे काम करण्यात येणार असल्याने शनिवारी मध्यरात्रीनंतर तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक पहाटे 1.15 ते 4.15 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे या मार्गावरील काही लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत, तर काही गाड्या मुंबई सेंट्रलपर्यंतच धावणार आहेत. पश्चिम रेल्वेने माहितीनुसार, फलाट क्रमांक 3 आणि 4 दरम्यान रोड क्रेनच्या सहाय्याने पादचारी दिलेलेल्या
कारण काय?
पुलाचे गर्डर बसवण्यात येणार आहेत. हे काम सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीनंतर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे चर्चगेटकडे जाणाऱ्या काही लोकल फेऱ्या मुंबई सेंट्रलपर्यंतच धावतील, तर काही पहाटेच्या फेऱ्या चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रल स्थानकातून धावणार आहेत. रात्री १२.१० वाजता बोरिवलीहून सुटणारी चर्चगेट लोकल, रात्री 11.49 वाजता विरारहून सुटणारी चर्चगेट लोकल, रात्री 12.30 वाजता बोरिवलीहून सुटणारी चर्चगेट लोकल तसेच रात्री 12.05 वाजता विरारहून सुटणारी चर्चगेट लोकल या सर्व गाड्या मुंबई सेंट्रलपर्यंतच धावणार आहेत. त्यामुळे या गाड्या मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान रद्द राहतील.
‘या’ मार्गावर लोकल सेवा बंद
मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोडचा थांबा रद्द होणार असून चर्चगेट मुंबई सेंट्रलवरही लोकल ट्रेन थांबणार नाही. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात शनिवारी आणि मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात शनिवारी आणि मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील ब्लाॅक काळात चर्चगेट – मुंबई सेंट्रल दरम्यानची लोकल सेवा बंद असणार आहे. तर, मध्य रेल्वेच्या ब्लाॅकमुळे मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्थानकांतील लोकल थांबा रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे या स्थानकातील प्रवाशांना पर्यायी मार्गाने इतर स्थानकांतून इच्छित स्थळी प्रवास करावा लागणार आहे. तर, पश्चिम रेल्वेच्या ब्लाॅकमुळे काही लोकल सेवा अंशत: रद्द करण्यात येणार आहेत.
कुठे असेल मेगाब्लॉक
सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत असणार आहे. सीएसएमटीवरून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी – विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपरवरून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या लोकल सेवा विद्याविहार ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान थांबतील. ब्लाॅक कालावधीत मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्थानकांवरील लोकलचा थांबा रद्द करण्यात आला आहे.
हार्बर मार्ग
कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत असणार आहे. सीएसएमटीवरून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 दरम्यान वाशी / बेलापूर / पनवेलला जाणाऱ्या डाऊन लोकल आणि पनवेल / बेलापूर / वाशीहून सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 दरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी – कुर्ला – सीएसएमटी आणि पनवेल – वाशी – पनवेल विभागांवर विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान प्रवास करण्याची परवानगी असेल.
पश्चिम रेल्वे
मरीन लाइन्स स्थानकादरम्यान सर्व मार्गिकावर मेगाब्लॉक असणार आहे. शनिवारी रात्री 1.15 ते पहाटे 4.15 दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. मरीन लाईन्स स्थानकात फलाट क्रमांक 3 आणि 4 दरम्यान रोड क्रेनद्वारे पादचारी पुलाच्या तुळई उभारण्यात येणार आहेत. ब्लाॅकमुळे काही लोकल अंशत: रद्द आणि काही लोकल सेवा पूर्णत: रद्द करण्यात येणार आहेत. बोरिवलीहून शनिवारी रात्री 12.10 वाजता सुटणारी चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रल स्थानकापर्यंत धावेल. त्यामुळे या लोकलची सेवा मुंबई सेंट्रल ते चर्चगेट स्थानकांदरम्यान उपलब्ध नसेल. रात्री 11.49, रात्री 12.05 ची विरार – चर्चगेट लोकल, रात्री 12.30 बोरिवली – चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रलपर्यंत चालवण्यात येईल. पहाटे 4.25 चर्चगेट – विरार, पहाटे 4.28 चर्चगेट – बोरिवली लोकल मुंबई सेंट्रलवरून नियोजित वेळापत्रकानुसार चालवण्यात येईल. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक घेण्यात येणार नाही.








